World Cup सुरू असताना टीम इंडियाच्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती, वयाच्या 33 वर्षी मोठा निर्णय
Retirement | वर्ल्ड कप सुरू असताना क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या एका युवा खेळाडूने वयाच्या 33 वर्षी निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनी, कोहली यांच्यासोबत खेळलेला हा खेळाडू आहे तरी कोण जाणून घ्या.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 स्पर्धा सुरू असून भारतीय संघाच रविवारी नेदरलँड संघासोबत सामना रंगणार आहे. भारताने सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. भारत आता फक्त दोन विजय वर्ल्ड कप ट्रॉफीपासून दूर आहे. भारतासाठी आता मोठी संधी आहे. मात्र वर्ल्ड कप सुरू असताना भारताच्या एका स्टार खेळाडूने निवृत्ती घेतल्याने क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. कारण वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी या खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे.
कोण आहे तो खेळाडू?
हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाहीतर पंजाबचा ऑल राऊंडर खेळाडू गुरकीरत मान असून शुक्रवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून त्याने निवृत्ती जाहीर केली. इन्स्टाग्रावर यासंदर्भात त्याने पोस्ट करत माहिती दिली. आयपीएलमध्येही गुरकीरत याने आपल्या नावाचा दबदबा केला होता. मात्र त्यानंतर काही खास कामगिरी करता आली नाही. महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली गुरकीरतने भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं.
2015 साली भारतामध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी संघात त्याला स्थान मिळालं होतं. पण त्याला त्या कसोटी सामन्यामध्ये प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यानंतक 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलबर्नमध्ये झालेल्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताकडून पदार्पण केलं होतं. या सामन्यांमध्ये फलंदाजीसह त्याने गोलंदाजीसुद्धा केली होती.
पोस्टमध्ये काय म्हणाला?
आज माझ्या अविश्वसनीय क्रिकेट प्रवासाचा निर्णय झाला असून भारतासाठी प्रतिनिधित्त्व करण्याचा मोठा मान मला मिळाला.माझे कुटुंब, मित्र, प्रशिक्षक आणि माझ्या सहकारी खेळाडूंनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. माझ्या प्रवासामध्ये मिळालेल्या मार्गदर्शन आणि पाठिंब्यासाठी बीसीसीआय आणि पीसीएचे आभार मानू इच्छितो, असं गुरकीरतने मान याने म्हटलं आहे.
View this post on Instagram
दरम्यान, आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला. 2022 मध्ये जेतेपद जिंकणाऱ्या गुजरात टायटन्स संघाचा तो एक भाग होता, पण तेव्हा त्याने एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये त्याने 41 सामन्यांत 121 च्या स्ट्राईक रेटने 511 धावा केल्या.