Happy Birthday Sunil Gavaskar : …तर सुनील गावस्कर आज मच्छीमार असते, काय आहे हा किस्सा?

| Updated on: Jul 10, 2024 | 9:28 AM

Happy Birthday Sunil Gavaskar : भारतीय टीमचे माजी कर्णधार आणि लीजेंड सुनील गावस्कर आज 75 वर्षांचे झालेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 34 शतक त्यांच्या नावावर आहेत. अशी कामगिरी करणारे क्रिकेट विश्वातील ते पहिले फलंदाज आहेत. 'Sunny Days' या आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी त्यांच्या जन्माच्यावेळचा एक किस्सा सांगितला आहे.

Happy Birthday Sunil Gavaskar : ...तर सुनील गावस्कर आज मच्छीमार असते, काय आहे हा किस्सा?
Sunil Gavaskar
Image Credit source: PTI
Follow us on

क्रिकेट विश्वात ‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्यासाठी आज 10 जुलैचा दिवस खास आहे. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि लीडेंड गावस्कर यांचा आज जन्म दिवस आहे. ते 75 वर्षांचे झालेत. त्यांनी आपल्या क्रिकेट करियरमध्ये अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड बनवलेत. 5 फूट 5 इंच उंचीच्या गावस्कर यांनी क्रिकेटच्या सर्वात मोठ्या फॉर्मेटमध्ये अनेक संस्मरणीय इनिंग खेळल्या. आजही या इनिंग्स फॅन्सच्या आठवणीत ताज्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 34 शतकांचा आकडा गाठणारे गावस्कर क्रिकेट विश्वातील पहिले फलंदाज आहेत. गावस्कर यांच्या आयुष्यात असे अनेक किस्से आहेत, जे ऐकून फॅन्स हैराण होतील. पण त्यांच्या आयुष्यात असं सुद्धा एक सत्य आहे, जे ऐकूण कोणी हैराण होईल.

सुनील गावस्कर यांच्या जन्माच्यावेळी रुग्णालयात त्यांच्यासोबत अशी एक घटना घडलेली, ज्यामुळे त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं असतं. नर्सची ती चूक सुधारली नसती, तर आज क्रिकेटच्या दिग्गजांमध्ये गावस्कर हे नाव नसतं. ‘Sunny Days’ या आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये सुनील गावस्कर यांनी हा उल्लेख केलाय. “माझ्या आयुष्यात नारायण मासुरकर नसते, तर आज मी क्रिकेटर बनलो नसतो, हे पुस्तकही लिहिल नसतं” असं सुनील गावस्कर यांनी म्हटलय.

माझ्या कानावर एक बर्थमार्क पाहिला होता

“माझा जन्म झाला, तेव्हा नन काका मला रुग्णालयात पहायला आले होते. त्यांनी माझ्या कानावर एक बर्थमार्क पाहिला होता. पुढच्यादिवशी ते पुन्हा रुग्णालयात आले. त्यांनी ज्या मुलाला उचलून घेतलं, त्याच्या कानावर ते निशाण नव्हतं. त्यानंतर रुग्णालयात सर्व मुलांना चेक करण्यात आलं. त्यावेळी एका मच्छीमाराच्या पत्नीच्या शेजारी त्यांनी मला पाहिलं” असं सुनील गावस्कर यांनी ‘Sunny Days’ या आपल्या ऑटोबायोग्राफीमध्ये हे लिहिलं आहे.

ही अदला बदली कशी झाली?

“रुग्णालयातील नर्सने चुकून मला तिथे ठेवलेलं. कदाचित मुलांना आंघोळ घालताना ही अदलाबदली झाली असावी. त्यादिवशी ही गोष्ट काकांच्या लक्षात आली नसती, तर कदाचित आज मी मच्छीमार असतो” असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. सुनील गावस्कर यांच्या क्रिकेटिंग करियरला आकार देण्यात त्यांचे वडील मनोहर गावस्कर, आई मीनल यांचं महत्त्वाच योगदान आहे. सुनील गावस्कर लहानपणी टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचे. त्यांची आई त्यांना गोलंदाजी करायची.