हरभजन सिंग बीसीसीआयवर भडकला! युजवेंद्र चहलच्या निवडीवरून स्पष्टच म्हणाला की…

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तीन सामन्यांची टी20 मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तिन्ही फॉर्मेटसाठी वेगवेगळे कर्णधार असून तसा संघ निवडण्यात आला आहे. युजवेंद्र चहल याची निवडही झाली आहे पण हरभजन सिंग याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

हरभजन सिंग बीसीसीआयवर भडकला! युजवेंद्र चहलच्या निवडीवरून स्पष्टच म्हणाला की...
युजवेंद्र चहलची निवड समजण्या पलीकडची, हरभजन सिंगची बीसीसीआयवर आगपाखड
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 4:31 PM

मुंबई :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी20 मालिका सुरु आहे. पण चर्चा रंगली आहे ती भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याची. त्याला कारणही तसंच आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आतापासूनच रोडमॅप तयार केला जात आहे. त्यामुळे तिन्ही फॉर्मेटमध्ये निवडलेल्या संघांची चर्चा रंगली आहे. हार्दिक पांड्या नसल्याने टी20 चं कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे देण्यात आलं आहे. वनडेसाठी केएल राहुल आणि कसोटीचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलं आहे. पण या तिन्ही संघांतील खेळाडूंची निवड चर्चेचा विषय ठरला आहे. टी20 फॉर्मेटमध्ये फिट बसणारे खेळाडूंना वनडे संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे आगामी टी20 वर्ल्डकप संघात त्यांना स्थान मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. संजू सॅमसननंतर असंच एक नाव सध्या चर्चेत आहे ते म्हणजे युजवेंद्र चहल..युजवेंद्र चहल याची निवड वनडे संघात करण्यात आली आहे. त्यामुळे माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने राग व्यक्त केला आहे. वनडे वर्ल्डकप संघातही त्याला स्थान न दिल्याने हरभजनने आगपाखड केली होती.

‘टी20 संघात युजवेंद्र चहल नाही. तुम्ही त्याला वनडे संघात घेतलं आहे आणि टी20 संघात डावललं. त्यांनी फक्त त्याला चोखण्यासाठी लॉलीपॉप दिला आहे. ज्या फॉर्मेटमध्ये त्याची कामगिरी जबरदस्त त्यात तुम्ही त्याला स्थान दिलं नाही. हे खरंच समजण्यापलीकडचं आहे.’, असा रोष हरभजन सिंग याने व्यक्त केला आहे. वनडे वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्यानंतर युजवेंद्र चहल सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीत खेळला होता. या स्पर्धेत तो हरयाणा संघाकडून खेळाला. या दहा सामन्यात त्याने एकूण 19 गडी बाद केले होते.

‘दक्षिण अफ्रिका दौरा वाटतो तितका सोपा नसेल. फलंदाजांची इथे चांगलीच कसोटी लागणार आहे. संघात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे नाही. त्यांचा पुनरागमनाचा मार्ग खडतर आहे. त्यामुळे काही खेळाडूंना संधी आहे. पण ते नामवंत खेळाडू आहेत हे विसरून चालणार नाही. मला वाटत नाही की निवडकर्त्यांनी राहाणे, पुजारा आणि उमेश यादव यांच्याशी चर्चा केली असेल.कारण हे जेव्हा खेळले तेव्हा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.’, असंही हरभजन सिंग पुढे म्हणाला.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.