Video : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये येताच रोहित, बुमराह आणि सूर्यकुमारला दिला आदेश! म्हणाला…

आयपीएल 2024 स्पर्धेसाठी आतापासून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स 17वं पर्व सुरु होण्यापूर्वी मोठी डील केली आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. 15 कोटी रुपये खर्च करून मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्याकडे ओढलं आहे. आता हार्दिक पांड्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Video : हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये येताच रोहित, बुमराह आणि सूर्यकुमारला दिला आदेश! म्हणाला...
Video : मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन होताच हार्दिक पांड्यामध्ये असा झाला बदल, रोहित आणि सूर्याला सांगितलं...
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 7:57 PM

मुंबई : आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत निवडलेल्या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव होतो. त्यामुळे या लीगमध्ये खेळण्याची प्रत्येक खेळाडूला आस असते. काही जणांना संधी मिळते, पण काही जणांची संधी हुकते. असं असताना आयपीएल 2024 स्पर्धेपूर्वी आयपीएलमधील हार्दिक पांड्याची डील चर्चेत आली आहे. 15 कोटी रुपये खर्च करून मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या ताफ्यात घेतलं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्समधील पुनरागमनामुळे खेळाडूंमध्ये बिनसल्याची चर्चा रंगली आहे. जसप्रीत बुमराहच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चर्चेला नवा रंग चढला आहे. दुसरीकडे, शुबमन गिल निष्ठेबाबत बोलल्याने त्याचा रोख हार्दिक पांड्याकडे असल्याचं सांगितलं जात आहे. आता हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सने पोस्ट केलेला व्हिडीओ चर्चेत आहे. यात हार्दिक पांड्या रोहित, बुमराह, सूर्या, इशान, मलिंगा यांना तयारीला लागण्यास सांगत आहे.

काय म्हणाला हार्दिक पांड्या?

“मी पुन्हा आलो आहे. रोहित, बुमराह, सूर्या, इशान,पॉलि, मलिंगा चला सुरु करूया. मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन केल्याने खरंच आनंद झाला. 2015 पासून माझी क्रिकेट कारकिर्द मुंबई इंडियन्सकडून सुरु झाली. त्यांनी 2013 मला नोटीस केलं होतं. जेव्हा मी पाठी वळून पाहतो तेव्हा 10 वर्षांचा काळ डोळ्यासमोरून जातो.बरं वाटतं की मी पुन्हा मुंबई इंडियन्समध्ये आलो. इथून क्रिकेट कारकिर्द सुरु झाली होती. त्यामुळे पुनरागमनचा आनंद आहे. माझे आकाश आणि पूर्ण कुटुंबासोबत चांगले संबंध आहेत. पलटण तुम्ही मला पहिल्यांदा सपोर्ट केला होता. आता मी पुन्हा एकदा सज्ज आहे. माझ्या हार्दिक स्वागतासाठी धन्यवाद.”, असं हार्दिक पांड्या या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या 123 सामन्यात होता. पण 115 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. पण 39 सामन्यात फलंदाजी मिळाली नाही. त्याने आतापर्यंत 2309 धावा केल्या आहेत. यात 91 ही सर्वोत्तम खेळी आहे. हार्दिकने 10 अर्धशतकं झळकावली आहेत. तर गोलंदाजीत 53 गडी बाद केले आहेत.

शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'
शरद पवारांकडून RSS चं कौतुक; 'हातचा मळ असा समज अन् गाफिल राहिलो, पण..'.
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?
पवार बाप-लेकीला सोडून दादांचा नवा प्लॅन? सुनील तटकरेंचं प्रपोजल काय?.
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप
चोराकडे न्याय मागत होती,पंकजाही धुतल्या तांदळासारखी नाही,मामीकडून आरोप.
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त
वाल्मिक कराडला CID ऑफिसमध्ये सोडणारा मुक्त अन् 'त्याची' गाडी जप्त.
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.