हार्दिक पांड्याच्या आयुष्यात बरंच काही घडतंय! वर्ल्डकप जेतेपद मुलासोबत केलं साजरं, नताशा गेली कुठे?

टी20 वर्ल्डकप जेतेपदात अष्टपैलू हार्दिक पांड्या याचा सिंहाचा वाटा राहिला आहे. हार्दिकने क्लासेन आणि मिलर हे दोन महत्त्वाचे गडी बाद केले आणि टीम इंडियाचा विजय सोपा केला. त्याच्या या खेळीचं सर्वत्र कौतुक होत आहे. हार्दिकने या विजयाचं सेलीब्रेशन कुटुंबियांसोबत केलं. मात्र पत्नी नताशा यात कुठेच दिसली नाही.

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात बरंच काही घडतंय! वर्ल्डकप जेतेपद मुलासोबत केलं साजरं, नताशा गेली कुठे?
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 10:24 PM

टी20 वर्ल्डकप जेतेपदानंतर संपूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे. टीम इंडियाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांनी त्यांना साथ दिली. त्यांचा विजयोत्सव सोहळा पाहण्यासाठी हजेरी लावली. पण या सर्व उत्साहात हार्दिक पांड्याची पत्नी कुठेच दिसली नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी कौतुकास्पद आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात त्याच्यावर टीका करणारेही शांत झाले. इतकंच काय तर त्याचा नावाचा उदो उदोही सुरु केला आहे. टीम इंडिया मुंबईत परतली तेव्हा जेतेपदाची ट्रॉफी हार्दिकच्या हातात होती. यावरूनच हार्दिक पांड्याची खेळी किती महत्त्वाची होती हे अधोरेखित होतं. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम अशी विजयी मिरवणूक निघाली. त्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये खेळाडूंना 125 कोटींचा धनादेश देऊन विजयोत्सवर साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वच खेळाडू घरी परतले आणि त्यांचं आनंदाने स्वागत करण्यात आलं. इतकंच काय तर विराट कोहली अनुष्काला भेटण्यासाठी थेट लंडनला रवाना झाला. हार्दिक पांड्याच्या घरीही विजयोत्सव साजरा झाला. पण या आनंदोत्सवात नताशा दिसली नाही.

हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत पांड्याचा मुलगा अगस्त्य दिसत आहे. आपल्या मुलासोबतचा फोटो शेअर करताना हार्दिक पांड्या म्हणाला की, “My #1! मी सर्वकाही केलं, मी जे केलं ते तुझ्यासाठी केलं.” यासह त्याने तीन लव्हचे इमोजी टाकले आहेत. या फोटोत कुठेच नताशा दिसत नसल्याने पुन्हा एकदा वावड्या उठण्यास सुरुवात झाली आहे. या दोघांमध्ये खरंच काही बिनसलं आहे का? असा प्रश्नही अनेकजण या पोस्टखाली विचारत आहेत. त्यामुळे या दोघांचा घटस्फोट झाल्याची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. पण या वृत्ताला अजून तरी कोणताच दुजोरा नसून फक्त सोशल मीडियावरची चर्चा आहे. दुसरीकडे, नताशाने विजयानंतर साधी पोस्टही लिहिलेली नाही, त्यामुळेही आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान, हार्दिक पांड्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर भावूक झाला होता. त्याने गेल्या सहा महिन्यात घडलेल्या चढउतारांचा पाढा वाचला. मैदानात झालेल्या हूटिंगबाबतही सांगितलं. पण आपण आपल्या खेळाने उत्तर दिल्याचंही स्पष्ट केलं. हार्दिक पांड्याने या स्पर्धेतील 8 सामन्यात एकूण 144 धावा केल्या. तसेच 11 गडी बाद केले. अंतिम सामन्यात त्याची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. त्याने 3 षटकात 20 धावा देत 3 गडी बाद केल. तसेच शेवटच्या षटकात 16 धावा हव्या असताना जबरदस्त गोलंदाजी केली आणि फक्त 8 धावा दिल्या. या कामगिरीनंतर आयसीसीने त्याचा सन्मान केला आहे. टी20 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी आहे.

संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे
संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत , निवडणुका या.. विकास ठाकरे.
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ
आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत... संतोष देशमुखांचे भाऊ.
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.