Hardik Pandya : प्रेशर मोमेंटला फूल कॉन्फिडन्स रिअॅक्शन…’अरे तुझा भाऊ सर्व …’
रविवारी भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना सामना थोडासा अखेरीस अडकला. या दरम्यान, एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. याविषयी अधिक जाणून घ्या...
नवी दिल्ली : बर्याच वेळा जेव्हा सामान्य गोपाहताष्टी अडकू लागतात तेव्हा आपण मित्र-मैत्रिणींमध्ये म्हणतो की टेन्शन मत ले, तेरा भाई है ना, तेरा भाई कर लेगा, असं आपण आगदी सहज म्हणतो. रविवारी आशिया चषकात (Asia Cup 2022) भारत आणि पाकिस्तानचे (IND vs PAK) संघ आमनेसामने आले आणि सामना अखेर अडकला, तेव्हा हार्दिक पांड्याची अशी प्रतिक्रिया (Hardik Pandya Confidence Reaction) समोर आली आहे, जिथे तो अशा पद्धतीने दिसतोय की, सर्व काही तुमचा भाऊ हाताळेल. तेरा भाई सब कर लेगा, असंच या व्हिडीओतून दिसूनही आलं. वास्तविक रविवारी भारतीय संघाची फलंदाजी सुरू असताना त्या वेळी सामना थोडासा अखेरीस अडकला. या दरम्यान, एक व्हिडीओ व्हायरल झालाय. त्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यात व्हिडीओत नेमकं काय आहे, ते जाणून घेऊया, त्यापूर्वी पाहूया नेमकं काय झालं होतं.
हा व्हिडीओ पाहा
Ye chiller attitude ?before the six that made ?? win tonight is… everything!!Respect to @hardikpandya7 training and confidence! #INDvsPAK https://t.co/q0ChEbM1OG
हे सुद्धा वाचा— Mukti Mohan (@thisIsMukti) August 28, 2022
That nod by Hardik Pandya to Dinesh Karthik, when the ball went straight to the fielder, assuring him everything’s all right. That confidence is what’s required in life.
— Sarang Sood (@SarangSood) August 28, 2022
नेमकं काय झालं होतं?
भारताला शेवटच्या दोन षटकात 21 धावा हव्या होत्या. 19व्या षटकात तीन चौकारांमुळे एकूण 14 धावा आल्या, तर शेवटच्या षटकात 7 धावा हव्या होत्या. पण शेवटच्या षटकात रवींद्र जडेजा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने प्रकरण पुन्हा रंजक बनले. यानंतर दिनेश कार्तिक क्रिजवर आला, त्याने सिंगल घेतली आणि स्ट्राईक हार्दिक पांड्याकडे आला.पण हार्दिक स्ट्राईकवर येताच त्याने डॉट बॉल खेळला. यानंतर हार्दिक पांड्याची ही प्रतिक्रिया समोर आली आहे.
हा व्हिडीओ पाहा
The level of confident …#pathukalaam #hardikpandiya #AsiaCup2022 #INDvsPAK pic.twitter.com/PBFFCJnOfY
— IndiaGlitz – Tamil (@igtamil) August 28, 2022
His confidence when he had a dot ball and the next ball goes for a six. @hardikpandya7 ?????? pic.twitter.com/vivkPmfUTu
— Jim Halpert (@jiimhalpert) August 28, 2022
बोट दाखवत मान हलवत
जिथे तो दिनेश कार्तिककडे बोट दाखवत मान हलवत आहे आणि हीच गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली, लोकांना ती खूप आवडली. सोशल मीडियाने हार्दिक पांड्याच्या आत्मविश्वासाची जोरदार प्रशंसा केली आणि म्हटले की त्याला हार्डकोर आत्मविश्वास म्हणतात. हार्दिक पांड्या हा पाकिस्तानविरुद्ध भारताचा सर्वात मोठा सामना विजेता म्हणून समोर आलाय. जिथे त्यानं प्रथम गोलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या.
आपल्या चार षटकांच्या कोट्यात हार्दिक पांड्याने केवळ 25 धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. यानंतर फलंदाजी करताना हार्दिक पांड्याने 17 चेंडूंत 4 चौकारांसह 33 धावा केल्या. आणि विजयी षटकाराचाही समावेश होता. हार्दिक पांड्या गेल्या काही वर्षात भारतासाठी सर्वात मोठा सामना विजेता म्हणून उदयास आला आहे, फक्त एका वर्षात त्याच्यात मोठा बदल झाला आहे.