मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हापासून टी 20 मध्ये कॅप्टन बदलाची चर्चा सुरु आहे. पुढचा टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये होणार आहे. त्यावेळी विद्यमान कर्णधार रोहित शर्माच वय 37 वर्ष असेल. त्यामुळे कॅप्टन बदलण्याची मागणी होतेय. उद्यापासून टीम इंडियाची न्यूझीलंड विरुद्ध मालिका सुरु होतेय. या मालिकेत टी 20 सीरीजच नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलय.
हार्दिकसाठी अग्निपरिक्षा
हार्दिक पंड्याचा परफॉर्मन्स पाहून त्यालाच टी 20 साठी कायमस्वरुपी कॅप्टन बनवण्याची मागणी होत आहे. न्यूझीलंड विरुद्धची मालिका हार्दिकसाठी अग्निपरिक्षा असेल. कारण न्यूझीलंडला मायदेशात हरवणं इतकं सोप नाहीय. तिथल्या कंडीशन्सशी जुळवून घेण्यात खेळाडूंचा कस लागेल.
रोहित शर्मा सध्या ब्रेकवर
हार्दिक पंड्याला टी 20 मध्ये कायमस्वरुपी कॅप्टन बनवण्यासाठी रवी शास्त्री यांनी पाठिंबा दिलाय. T20 साठी नवीन कॅप्टन निवडण्यात काहीही चुकीच नाहीय, असं रवी शास्त्री यांचं मत आहे. कॅप्टन बदलाची मागणी होत असली, तरी रोहित शर्माबद्दल तडकाफडकी कुठलाही निर्णय घेण्यास बीसीसीआय तयार नाहीय. रोहित शर्मा सध्या ब्रेकवर आहे. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
रवी शास्त्रींच म्हणण काय?
“टी 20 क्रिकेटमध्ये नवीन कॅप्टन निवडण्यात कुठलाही धोका नाहीय. सध्या क्रिकेटच प्रमाण बघता, एका खेळाडूसाठी तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळणं सोप नाहीय. रोहित कसोटी आणि वनडेमध्ये नेतृत्व करत असेल, तर टी 20 साठी नवीन कॅप्टन निवडण्यात काहीही धोका नाहीय. हार्दिक पंड्या तो कॅप्टन असेल, तरी चालेल” असं रवी शास्त्री म्हणाले.
BCCI कोहली, रोहित, राहुल द्रविड तिघांशी बोलणार
रोहित शर्माने टी 20 मधील त्याच भवितव्य ठरवावं, अशी बीसीआयची इच्छा आहे. ब्रेक संपल्यानंतर बीसीसीआय सिलेक्टर्स, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांच्यासोबत पुढच्या निर्णयांबद्दल चर्चा करेल. बीसीसीआय कोहलीच्या सुद्धा टी 20 मधील भवितव्याबद्दल चर्चा करेल. T20 मध्ये हार्दिक पंड्याला पूर्ण वेळ कॅप्टन बनवण्यासंदर्भात पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयकडून निर्णय घेतला जाईल. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया जानेवारीपर्यंत कुठलीही टी 20 मालिका खेळणार नाहीय.
तो पर्यंत रोहितच कॅप्टन
“हा महत्त्वाचा निर्णय आहे. पण आम्ही घाई करणार नाही. रोहित आणि राहुल द्रविड यांच्यासोबत पुढच्या 2024 च्या टी 20 वर्ल्ड कपबाबत चर्चा करु. पुढच्यावर्षाच्या सुरुवातीला निर्णय घेऊ. तो पर्यंत रोहितच सर्व फॉर्मेटमध्ये कॅप्टन असेल” असं वरिष्ठ बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्ला सांगितलं.