कृणाल आणि हार्दिक पांड्या या भावांमध्ये बिनसलं? त्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात गेल्या वर्षभरात बरीच वादळं आली. सर्वकाही रुळावरून घसरल्याचं दिसत आहे. घटस्फोट झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या. असं असताना आणखी एक बातमी समोर येत आहे. त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलं आहे.

कृणाल आणि हार्दिक पांड्या या भावांमध्ये बिनसलं? त्या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चर्चा
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 9:52 PM

हार्दिक पांड्या आणि वाद हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने त्याला संघात घेतलं. तिथपासून वाद सुरु झाला तो काही थांबण्याचं नाव घेत नाही. इतकंच काय पत्नी नताशासोबत संसारही मोडला आहे. दोघांनी सोशल मीडियावरून घटस्फोट झाल्याचं जाहीर केलं आहे. हा वाद शमतो ना शमतो तोच नव्या चर्चेला फोडणी मिळाली आहे. पण या चर्चेत किती तथ्य आहे हे मात्र अस्पष्ट आहे. सोशल मीडियावर लोकं त्यांना हवा तसा अंदाज लावत आहेत. त्याचं झालं असं की, कृणाल पांड्याच्या घरी गणपतीचं आगमन झालं आहे. पण यावेळी हार्दिक पांड्या कुठेच दिसला नाही. हार्दिक पांड्या मुंबईत असूनही गैरहजर असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. कारण वेगळ्या शहरात असता तर चर्चेला काहीच स्थान मिळालं नसतं. पण एकाच शहरात असूनही गणपतीला न गेल्याने चर्चा होत आहे.

हार्दिक पांड्याची वहिनी पंखुडी शर्माने इंस्टाग्रावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत कृणाल आणि पंखुडी पुजेची तयारी करत असल्याचं दिसत आहेत. गणपतीचा थाटमाट व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. जवळचे सर्व नातेवाईक या पूजेला हजर होते. पण हार्दिक पांड्या कुठेच दिसला नाही. हार्दिक पांड्या मुंबईत असूनही न आल्याने आता चर्चा तर होणार..हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटानंतर दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याची चर्चा रंगली आहे. या सोहळ्यात अगस्त्या दिसला आणि त्याने गणपतीची पूजाही केली. पण या चर्चा सुरु असताना हार्दिकच्या एका कमेंटने सर्वकाही दूर झालं आहे. त्याने पंखुडीने शेअर केलेल्या व्हिडीओवर कमेंट करत प्रेमाचं प्रतिक असलेली इमोजी टाकली आहे.

hardik_Pandya (7)

दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कृणाल पांड्या आणि त्याची पत्नी हार्दिकची एकही पोस्ट लाईक करत नाहीत. तसेच त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारची पोस्ट करत नाही. इतकंच काय तर अनंत अंबानीच्या लग्नात हार्दिक पांड्या एकटा गेला होता. त्याच्यासोबत कुटुंबातील एकही सदस्य नव्हता. अगस्त्या हार्दिकच्या घरीच राहात आहे. पण त्या संदर्भातील एकही फोटो समोर आलेला नाही. त्यामुळे चर्चेत काही तथ्य आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.