घटस्फोटानंतर नताशा स्टॅन्कोविकच्या पहिल्या इन्स्टा पोस्टवर हार्दिकची प्रतिक्रिया, केलं असं की…
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्यात अधिकृतरित्या घटस्फोट झाल्याचं दोघांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांवर पडदा पडला आहे. मात्र या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याने नताशाच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
हार्दिक पांड्याच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यात बरंच काही घडलं आहे. मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद मिळूनही अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर टी20 संघांची धुरा मिळेल असं वाटत असताना कर्णधारपदाची माळ सूर्यकुमारच्या गळ्यात पडली. असं असताना हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅन्कोविक यांच्या पोस्टने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांवर पडदा पडला. त्या दोघांनी चार वर्षानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय जाहीर केला. या घटस्फोटानंतर नताशाने इन्स्टाग्रामवर 10 फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत अगस्त्याही दिसत आहे. नताशाने फोटो टाकल्या टाकल्या काही मिनिटातच हार्दिकने त्या फोटो पोस्टवर कमेंट केली. त्याने फोटोला लाईक केलं आणि दोन वेगवेगळ्या कमेंट्स केल्या. यानंतर हार्दिक पांड्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नताशाने मुलासोबतचे फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये हॉर्ट इमोजी टाकला आहे. या फोटोत ती मुलगा अगस्त्यसोबत डायनासोर पार्कमध्ये फिरताना दिसत आहे.
हार्दिक पांड्याने या फोटोखाली कमेंट्स करताना हार्ट इमोजी टाकली. त्यानंतर नजर लागू नये, प्रेम आणि छान अशी इमोजी टाकली. त्यानंतर या फोटोखाली कमेंट्स देण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, इतकं मोठं हृदय फक्त हार्दिक पांड्याकडेच असू शकतं. इतकंच हार्दिक पांड्याचा मोठा भाऊ कृणाल पांड्या यानेही हार्ट इमोजी टाकलं आहे. हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 18 जुलैला वेगळं झाल्याची बातमी दिली होती. त्यानंतर नताशा मुलासोबत निघून गेली. तर हार्दिक पांड्या टी20 मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर आला आहे.
View this post on Instagram
हार्दिक आणि नताशाने वेगळं होताना लिहिलं होतं की, ‘चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी हा कठीण निर्णय ङोता. कारण आम्ही एक कुटुंब म्हणून एकत्र राहिलो, एकमेकांचा आदर केला आणि पाठिंबा दिला. अगस्त्यासारखी भेट मिळाली. आता तो आमच्या जीवनाचा केंद्र असेल. आम्ही एकमेकांना पूर्ण साथ देऊ. अगस्त्यासाठी शक्य ते करू त्यातून त्याला आनंद मिळेल.’