MI vs SRH : सूर्यकुमार यादवची विजयी खेळी, हार्दिक पंड्या म्हणाला…

Hardik Pandya Post Match Presentation MI vs SRH IPL 2024 : मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध सांघिक कामगिरी केली. पलटणच्या विजयानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला जाणून घ्या?

MI vs SRH : सूर्यकुमार यादवची विजयी खेळी, हार्दिक पंड्या म्हणाला...
hardik pandya mi vs srh,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 12:46 AM

मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर धमाकेदार विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला. हैदराबादने विजयासाठी दिलेलं आव्हान मुंबईने 16 बॉल राखून आणि 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हैदराबादने मुंबईसमोर विजयासाठी 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान 3 विकेट्स गमावून 17.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

मुंबईची 174 धावांचा पाठलाग करताना 3 बाद 31 अशी नाजूक स्थिती झाली होती. मात्र तिथून सूर्यकुमारने तिलक वर्मा याच्यासह मुंबईचा डाव सावरला. सूर्याने परिस्थितीनुसार बॅटिंग केली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सूर्याने टॉप गिअर टाकला आणि फटकेबाजी सुरु केली. सूर्याने 30 बॉलमध्ये अर्धशतक ठोकलं. त्यानंतर सूर्याने आणखी वेगात फटकेबाजी केली. सूर्याने मुंबईला विजयासाठी 6 धावांची गरज असताना सिक्स ठोकला. मुंबईने या सिक्ससह विजय मिळवला आणि सूर्याचं शतकही पूर्ण झालं. सूर्याने 51 बॉलमध्ये 12 चौकार आणि 6 सिक्स ठोकले. सूर्या 102 धावांवर नाबाद परतला. या विजयानंतर मुंबईचा कॅप्टन सूर्याबाबत आणि एकूण काय म्हणाला हे जाणून घेऊयात.

हार्दिक पंड्या काय म्हणाला?

“आम्हाला चांगलं क्रिकेट खेळण्यावर लक्ष द्यायचंय. आम्ही 10-15 धावा जास्त दिल्या, असं वाटतं. आमचे बॅट्समन्सनी अफलातून बॅटिंग गेली. मला योग्य ठिकाणी बॉलिंग करायला आवडतं. मी परिस्थितीनुसार बॉलिंग करतो. मी आज योग्य ठिकाणी बॉलिंग केली आणि ती कामी आली. सूर्यकुमार यादव गोलंदाजांवर दबाव आणतो, हा त्याचा भूतकाळ आहे. सूर्यकुमारचा खेळ बदलला. तो सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. तो खेळ वेगळ्या पद्धतीने बदलू शकतो”, असं हार्दिकने सामन्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान म्हणाला.

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.