Harshal Patel RCB : मुंबईच्या तोफांमध्ये पाणी भरलं, पंड्या बंधू, पोलार्डला नाचवलं, कोण आहे हर्षल पटेल?

IPL 2021 मधील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Banglore) विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले आहे.

Harshal Patel RCB : मुंबईच्या तोफांमध्ये पाणी भरलं, पंड्या बंधू, पोलार्डला नाचवलं, कोण आहे हर्षल पटेल?
Harshal Patel
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 10:06 PM

चेन्नई : IPL 2021 मधील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (Royal Challengers Banglore) विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले आहे. मुंबईने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्सच्या बदल्यात 159 धावा केल्या. मुंबईकडून ख्रिस लिनने सर्वाधिक 49 धावा केल्या. तर बंगळुरूकडून जलदगती गोलंदाज हर्षल पटेलने सर्वाधिक 5 विकेट्स अर्धा संघ पव्हेलियनमध्ये पाठवला. मुंबईविरोधात एकाच सामन्यात पाच विकेट घेणारा जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. 14 वर्षांच्या आयपीएल इतिहासात अशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाला करता आलेली नाही. त्याने आज 4 षटकात 27 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. (Harshal Patel IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Latest News in Marathi, MI vs RCB)

आजच्या सामन्यात सुरुवातीला मुंबईच्या वरच्या क्रमांकावरील फलंदाजांनी हर्षलच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता. परंतु वैयक्तिक दुसऱ्या षटकात त्याने विस्फोटक फलंदाज हार्दिक पंड्याला पायचित (LBW) पकडत पहिलं यश मिळवलं. त्यानंतर तिसऱ्या षटकात त्याने इशान किशनला बाद करत दुसरं यश मिळवलं. वैयक्तिक चौथ्या आणि सामन्यातील 20 व्या षटकात हर्षलने तीन विकेट्स घेतल्या. परंतु त्याला हॅटट्रिक साधता आली आहे. या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्याने कृणाल पंड्याला डॅन ख्रिश्चनकरवी झेलबाद केलं, त्या पुढच्याच चेंडूवर त्याने कायरन पोलार्डला वॉशिंग्टन सुंदरकडे झेल ध्यायला भाग पाडलं. पुढच्या चेंडूवर त्याला हॅट्ट्रिकची संधी होती खरी, परंतु Marco Jansen ने हा चेंडू खेळून काढला. परंतु त्या पुढच्या चेंडूवर हर्षलने Jansen ला त्रिफळाचित केलं. अशा पद्धीने पटेलने आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेत यंदाच्या हंगामाचा श्रीगणेशा केला आहे.

काय म्हणाला हर्षल?

मुंबईचा डाव संपल्यानंतर समालोचकांशी बोलताना पटेल म्हणाला की, तुम्ही केवळ तुमच्या विरोधी संघाकडे पाहून चालत नाही, तुमचं नियोजन आणि अंमलबजावणीवर (planning and execution) लक्ष केंद्रित केलं पाहिजे. मला आधीच माहिती होतं की मला डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. परंतु शेवटच्या षटकात मला तीन बळी मिळाले. त्यामुळेच मला पाच बळींचा टप्पा (five-wicket haul) पूर्ण करता आला. माझं हे यश मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाविरोधातलं आहे, याचाही आनंद आहे.

हर्षल पटेलची क्रिकेट कारकीर्द

हर्षल पटेल आयपीएलमध्ये यापूर्वी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला आहे. आपल्या आयपीएल कारकीर्दीत पटेलने 48 सामन्यांमध्ये 46 बळी घेतले आहेत. 28 धावांत 3 बळी ही त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. परंतु आजच्या सामन्यानंतर 27 धावांत 5 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असेल. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये हर्षल पटेलने आतापर्यंत 64 सामन्यांमध्ये 113 डावात 226 बळी मिळवले आहेत. 34 धावात 8 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 57 सामन्यांमध्ये 80 बळी मिळवले आहेत. 21 धावात 5 ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. तर आतापर्यंत 96 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 98 बळी मिळवले आहेत. 14 धावात 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

संबंधित बातम्या

Video | शांत संयमी असलेल्या राहुल द्रविडचा पारा चढला, भर रस्त्यात गाडीचा आरसा फोडला, पाहा व्हिडीओ

IPL 2021 | आयपीएलच्या 14 व्या मोसमाचा थरार आजपासून, 6 शहरांत आयोजन, 11 डबल हेडर मॅच आणि बरंच काही…!

(Harshal Patel IPL 2021 RCB Team Player Profile Stats ICC Ranking Photos Latest News in Marathi, MI vs RCB)

'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.