WTC 2023 : युवा खेळाडूला लागली लॉटरी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या संघात निवड!

AUS vs IND : आयपीएलमध्ये पंजाबच्या ताफ्यात होता मात्र पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. पण आता थेट संघात निवड झाली आहे.

WTC 2023 : युवा खेळाडूला लागली लॉटरी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या संघात निवड!
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात चांगले वेगवान गोलंदाज आहेत. दोन्ही संघांच्या वेगवान गोलंदाजांचा अनुभव पाहता हा लढा वाटतो तितका सोपा नसेल.
Follow us
| Updated on: Jun 04, 2023 | 7:51 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या फायनल 2023 सामन्याआधी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा मॅचविनर खेळाडू जोस हेडलवूड हा दुखापतीमुळे फायनल सामन्यामधून बाहेर पडला आहे. फायनल सामन्याला काही दिवस शिल्लक असताना स्ट्राइक बॉलर बाहेर झाल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑस्ट्रेलिया टीम मॅनेजमेंटने जोश हेलजवूड दुखापती झाल्याने त्याच्या जागी एका युवा खेळाडूला संघात स्थान दिलं आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये जोस हेझलवूडच्या जागी मायकेल नेसरला संधी देण्यात आली आहे. या खेळाडूने 2 कसोटी सामन्यात 16.71 च्या सरासरीने 7 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच मायकेल नेसर हा बॅटींगही करू शकतो. मायकेल नेसरने देशांतर्गत क्रिकेट व्यतिरिक्त प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खूप प्रभाव टाकला आहे. यामुळेच त्याला हेजलवूडच्या जागेवर संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये हा खेळाडू पंजाबच्या ताफ्यात सामील होता.

दुखापतीमुळे जोस हेजलवूडला सामन्याला मुकावं लागणार आहे. आयसीसीने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. आयपीएलमध्ये शेवटचा सामना मुंबई इंडिअन्सविरूद्ध  वानखेडे स्टेडियवर खेळला होता. आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून खेळताना त्याने तीन सामने खेळले होते यामध्ये त्याला तीन बळी मिळवण्यात यश आलं होतं.

ऑस्ट्रेलियन संघाच्या सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीत हेजलवुडचा समावेश होता. त्यामुळे हा स्ट्राईक बॉलरच दुखापतीमुळे बाहेर पडल्याचा ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. तसं भारतामध्येही बरेच हुकमी खेळाडू हे दुखापतीमुळे बाहेर आहेत. यामध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि के.एल. राहुल यांचा समावेश आहे.

दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने असतील.

WTC 2023 फायनलसाठी अंतिम स्क्वॉड :

ऑस्ट्रेलिया संघ: पॅट कमिन्स (C), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (W), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.