‘तो मेहनती नव्हता, मतलबी होता, संघात फक्त माझं ऐकावं अशी त्याची वृत्ती’, ग्रेग चॅपेल यांचे सौरव गांगुलीवर सनसनाटी आरोप
भारताचे प्रशिक्षक राहिलेल्या ग्रेग चॅपेल यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर अनेक सनसनाटी आरोप केले आहेत. (he just Want to Captain Greg Chappel Attacked Saurav Ganguly)
मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल(Greg Chappel) यांनी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर (Saurav Ganguly) अनेक सनसनाटी आरोप केले आहेत. तो मेहनती नव्हता. खूप मतलबी होता. त्याला खेळाविषयी काही देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त कॅप्टन्सीविषयी मतलब होता, असे सनसनाटी आरोप ग्रेग चॅपेल यांनी केले आहेत. भारताचे अतिशय वादग्रस्त प्रशिक्षक म्हणून ग्रेग चॅपेल यांची ओळख आहे. त्यांचा कार्यकाळ अतिशय वादाग्रस्त ठरला. (he just Want to Captain Greg Chappel Attacked Saurav Ganguly)
चॅपेल यांची सौरववर चिखलफेक
चॅपेल यांनी एका पॉडकास्ट दरम्यान सौरव गांगुलीवर चिखलफेक केली. गांगुली हा केवळ स्वार्थी होता. संघातील खेळाडूंविषयी त्याला देणंघेणं नव्हतं. संघात फक्त माझं ऐकावं अशी त्याची वृत्ती होती. त्याच्या खेळाकडे त्याचं लक्ष नव्हतं वा त्याच्या खेळात सुधारणा करण्यावरही त्याचं लक्ष नसायचं. त्याच्या कॅप्टन्सीमध्येही अनेक चुका होत्या. तो मेहनती नव्हता. त्याच्या खेळात सुधारणा व्हाव्यात, असं त्याला कधीच वाटायचं नाही. केवळ मी कर्णधार असावा, एवढंच त्याला वाटायचं, असे सनसनाटी आरोप करत ग्रेग चॅपेल यांनी सौरववर चिखलफेक केली आहे.
द्रविडची स्तुती, सौरववर हल्लाबोल
सौरव किती वाईट होता हे सांगताना त्यांनी राहुल द्रविडची स्तुती केली. द्रविड खूप चांगला कर्णधार होता. त्याला भारताचा संघ जगातील टॉप संघ व्हावा, असं वाटायचं. टीममध्ये बदल करावेत, असं मला वाटाचयं. कारण माझं ते काम होतं. काही वाईट गोष्टी घडण्याअगोदर द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघाने वर्षभर चांगली कामगिरी केली. द्रविडला नेहमी वाटायचं भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांमध्ये असावा. त्यासाठी तो प्रयत्नशील असायचा, अशा शब्दात चॅपेल यांनी राहुल द्रविडचं कौतुक केलं.
त्यामुळे मला सिनिअर खेळाडूंनी विरोध केला
संघातील काही सिनिअर खेळाडूंचं करिअर संपणार होतं, त्यामुळे माझ्या बदलांना त्यांनी विरोध करायला सुरुवात केली जो विरोध खूपच टोकाला गेला. जेव्हा सौरव गांगुलीला संघाबाहेर जावं लागलं तिथे आपली काय गय केली जाणार, असा मेसेज संघातील सिनिअर खेळाडूंपर्यंत गेला. त्यामुळे त्यांनी मला विरोध करायला सुरुवात केली. भारतातील दोन वर्ष खूपच आव्हानात्मक होती, असं चॅपेल म्हणाले.
आतापर्यंतचे वादग्रस्त प्रशिक्षक म्हणून चॅपेल यांची ओळख
ग्रेग चॅपेल यांची ओळख आतापर्यंतचे सर्वांत वादग्रस्त भारतीय प्रशिक्षक म्हणून ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात भारताने अतिशय वाईट कामगिरी केली. त्यांच्याच कार्यकाळात भारताने अनेक मालिका गमावल्या. त्यांच्यात कार्यकाळात भारताला 2007 च्या वर्ल्डकपमध्ये बांगलादेशने साखळी फेरीतून बाहेर काढलं. त्यांनी मे 2005 ते वर्ल्डकप 2007 पर्यंत भारताचं प्रशिक्षकपद सांभाळलं.
(he just Want to Captain Greg Chappel Attacked Saurav Ganguly)