पंजाब किंग्सचा प्रशिक्षक होताच रिकी पाँटिंग अ‍ॅक्शन मोडमध्ये, या खेळाडूला कर्णधार बनवण्यासाठी तयारी

आयपीएल 2025 स्पर्धा आतापासून चर्चेत आली आहे. सर्व प्रथम दहा फ्रेंचायझी कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार इथपासून लिलावात कोणत्या खेळाडूसाठी मोठी बोली लागणार याची चर्चा सुरु आहे. असं असताना पंजाब किंग्सने आतापासून मोर्चेबांधणी सुरु केली आहे. इतकंच काय तर कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालायची याबाबत खलबतं सुरु झाली आहेत.

पंजाब किंग्सचा प्रशिक्षक होताच रिकी पाँटिंग अ‍ॅक्शन मोडमध्ये, या खेळाडूला कर्णधार बनवण्यासाठी तयारी
Image Credit source: (PC-GETTY IMAGES)
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 3:45 PM

आयपीएल 2025 स्पर्धेसाठी खेळाडूंची रिटेन्शन यादी देण्यासाठी आता अवघ्या 48 तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आता कोणते प्लेयर्स रिटेन होणार आणि कोणते रिलीज होणार हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. त्यामुळे काही खेळाडू रिलीज करताना काही खेळाडूंच्या खरेदीकडे फ्रेंचायझीचं लक्ष असणार आहे. पंजाब किंग्सची कामगिरी मागच्या 17 पर्वात काही खास राहिलेली नाही. फक्त एकदाच अंतिम फेरी गाठण्यात यश आलं आहे. मात्र इतर वेळेस संघाची स्थिती नाजूक असल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, पंजाब किंग्सने आपल्या संघात उलथापालथ होण्यापूर्वी मॅनेजमेंटमध्ये बराच बदल केला आहे. रिकी पाँटिंगकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. असं असताना पंजाब किंग्सला पहिलं जेतेपद मिळवून देण्यासाठी श्रेयस अय्यरवर नजर असणार आहे. प्रशिक्षक रिकी पाँटिंग श्रेयस अय्यरला पंजाब किंग्सचा कर्णधार बनवू इच्छित आहे.

आयपीएलमध्ये श्रेयस अय्यर आणि रिकी पाँटिंग यांनी यापूर्वीही एकत्र काम केलं आहे. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असताना रिकी पाँटिंग हेड कोच होता. वर्ष 2019 मध्ये श्रेयस अय्यरकडे दिल्ली कॅपिटल्सची धुरा सोपवण्यात आली होती. दोन वर्षे त्याने ही भूमिका बजावली. 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली होती. पण मुंबई इंडियन्सकडून पराभव झाला होता. 2021 मध्ये दिल्लीने कर्णधारपदाची धुरा ऋषभ पंतकडे गेली. त्यानंतर श्रेयसने कोलकाता नाईट रायडर्सचा हात धरला आणि मागच्या पर्वात विजय मिळवून दिला.

मागच्या पर्वात कोलकाता नाईट रायडर्सला जेतेपद मिळवून दिल्यानंतर आता त्याला रिलीज करणार की नाही हा प्रश्न आहे. जर कोलकात्याने रिलीज केलं तर पंजाब किंग्स मोठी रक्कम मोजून श्रेयसला आपल्या संघात घेण्यास इच्छुक असेल. मागच्या पर्वात शिखर धवनच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा होती. मध्यात शिखर धवन दुखापतग्रस्त झाला आणि जितेश शर्माकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं. पण यावेळी पंजाब किंग्सला एका फुल टाईम कर्णधाराची गरज आहे. सर्व बाजूने विचार केला तर श्रेयस अय्यर यात बरोबर फिट बसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.