चेन्नईच्या पराभवानंतर स्टीफन फ्लेमिंग पत्रकार परिषदेत भडकला, रागाच्या भरात दिलं असं उत्तर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने चेन्नई सुपर किंग्सला 50 धावांनी पराभूत केलं. या पराभवानंतर चाहत्यांचा संताप झाला आहे. दुसरीकडे या पराभवाचे परिणाम पत्रकार परिषदेतही दिसले. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांचा रागावरचा ताबा सुटला आणि पत्रकारासोबत वाद घातला. एक प्रश्नाला तर मूर्खपणा असं उत्तर दिलं.

चेन्नई सुपर किंग्सची स्पर्धेतील सुरुवात विजयाने झाली. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला 4 गडी राखून पराभूत केलं होतं. मात्र दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 50 धावांनी पराभव केला. मात्र या पराभवानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने 50 धावा म्हणजे कमीच असं वक्तव्य केलं. त्यामुळे आधीच चाहत्यांचा संताप झाला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंग पत्रकार परिषदेत संतापला आहे. स्टीफन फ्लेमिंगचा पारा यावेळी खूपच चढलेला दिसला. त्यांनी सगळा राग पत्रकारावर काढला. इतकंच काय तर चेपॉकमध्ये घरच्या मैदानाचा कोणताही फायदा नाही, असंही सांगितलं.हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. एका पत्रकाराच्या प्रश्नाने फ्लेमिंगही नाराज झाले आणि त्यांनी त्याला मूर्ख प्रश्न म्हटले.
पत्रकार आणि फ्लेमिंगचं असं झालं संभाषण
पहिल्या सामन्यात तुम्ही 20 षटकांत 156 धावा केल्या. आत फक्त 146 धावा केल्या. मला माहित आहे की ही तुमची क्रिकेट खेळण्याची पद्धत आहे, पण ही पद्धत काहीशी जुनी झाली आहे? असं वाटतं का? असा प्रश्न एका पत्रकाराने विचारले. फ्लेमिंग म्हणाला की, आमच्या खेळण्याच्या शैलीबद्दल तू काय म्हणण्याचा प्रयत्न करीत आहेस? तुम्ही असे बोलत आहात जणू काही आमच्याकडे शस्त्रशक्ती नाही. पण आपल्याकडे सर्व प्रकारची अग्निशक्ती आहे. मला तुमचा प्रश्न समजला नाही. क्रिकेटमध्ये जिंकणे आणि हरणे हे नैसर्गिक आहे. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की आम्ही पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळलो नाही, नशिबाची साथ आम्हाला मिळाली नाही. पण आम्ही सकारात्मक क्रिकेट खेळतो. आम्हाला कमी लेखू नका! असा इशारा त्याने इशारा दिला.
यावर पत्रकाराने उत्तर दिले की, “मी तुम्हाला कमी लेखत नाहीये,” पण एका अर्थाने तुम्हीही तेच केले, असं फ्लेमिंगने सांगितलं. फ्लेमिंगचा पारा इतका चढला की त्याने, हा एक मूर्खपणाचा प्रश्न असं सांगून टाकलं. या शाब्दिक युद्धामुळे पत्रकार परिषद चर्चेचा विषय बनली. चेन्नईची शैली जुनी झाली आहे ही टीका फ्लेमिंगने फेटाळून लावली.
सीएसकेला घरच्या मैदानावर फायदा आहे असे अनेकांना वाटते, परंतु फ्लेमिंगने त्याला स्पष्टपणे नकार दिला. आम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आहोत की चेपॉक मैदानावर कोणताही फायदा होणार नाही. आम्ही इतर ठिकाणी दोनदा जिंकलो आहोत, पण येथे आम्हाला पुरेशी कामगिरी करता आलेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला विकेट्स समजू शकली नाही. हे जुने चेपाक नाहीय. आपण इथे चार फिरकीपटू खेळवू शकत नाही. प्रत्येक सामन्यात खेळपट्टीचे स्वरूप बदलत आहे, म्हणूनच आम्हाला जिंकण्यासाठी थोडे संघर्ष करावा लागत आहे, असं फ्लेमिंगने पुढे सांगितलं.