IND vs PAK : 30 नोव्हेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना, टीम इंडिया जाहीर

आशिया कप अंडर 19 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे संघ आमनेसामने येणार आहेत. 30 नोव्हेंबरला हा हायव्होल्टेज सामना होणार आहे. मोहम्मद अमीनच्या नेतृत्वात भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. चला जाणून घेऊयात हा सामना कुठे होणार ते..

IND vs PAK : 30 नोव्हेंबरला भारत पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना, टीम इंडिया जाहीर
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 6:46 PM

आशिया अंडर 19 स्पर्धेला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या 11 व्या पर्वाचं आयोजन युएईत करण्यात आलं आहे. गतविजेत्या बांग्लादेश आणि अफगाणिस्तान या सामन्यापासून स्पर्धेला सुरुवात होईल. आशिया अंडर 19 स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी झाले आहेत. तसेच चार चार संघांचे दोन गट पाडले आहेत. भारत अ गटात असून यात पाकिस्तान, जापान आणि यूएई हे संघ आहेत. भारत पाकिस्तान एकाच गटात असल्याने या दोन्ही संघांकडे आहे. स्पर्धेत क्रीडप्रेमींचं लक्ष हे भारत पाकिस्तान सामन्याकडे लागून आहे. 30 नोव्हेंबरला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले भारत पाकिस्तान संघ आमनेसामने उभे ठाकणार आहेत. मागच्या पर्वात भारतीय संघ जेतेपदापासून दूर राहिली होती. पण या स्पर्धेत भारताचा दबदबा राहिला आहे. भारताने मागच्या 10 पर्वात 8 वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. त्यामुळे 11 व्या पर्वातही भारतीय संघ प्रमुख दावेदार मानला जात आहे.

स्पर्धेत भारताचा दुसरा सामना जापानशी होणार आहे. हा सामना शारजाहच्या मैदानावर 2 डिसेंबरला होणार आहे. तर 4 डिसेंबरला भारत आणि यूएई यांच्यात लढत होणार आहे. साखळी फेरीत दोन सामने जिंकल्यास उपांत्य फेरीत स्थान पक्कं होणार आहे. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आणि ऑनलाईन स्ट्रिमिंग हे सोनी स्पोर्ट नेटवर्कवर होणार आहे. तसेच सोनी लिव एपवर स्पर्धा पाहता येणार आहे. आशिया कप स्पर्धा वनडे फॉर्मेटमध्ये असणार आहे. भारतीय वेळेनुसार सर्व सामने सकाळी 10.30 वाजता सुरु होणार आहेत.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारत: आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमन (कर्णधार), किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पनगालिया (विकेटकीपर), अनुराग कवडे (विकेटकीपर), हार्दिक राज, मोहम्मद ईनान, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.

पाकिस्तान: साद बेग (कर्णधार/विकेटकीपर), मोहम्मद अहमद, हारून अर्शद, तय्यब आरिफ, मोहम्मद हुजेफा, नवीद अहमद खान, हसन खान, शाहजेब खान, उस्मान खान, फहम-उल-हक, अली रझा, मोहम्मद रियाजुल्ला, अब्दुल सुभान, फरहान युसूफ, उमर झैब.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.