मोठी बातमी! टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विनर खेळाडूवर गुन्हा दाखल, मोठ्या केसमध्ये अडकला स्टार खेळाडू
Team India Former Player माजी खेळाडू आणि तत्कालीन डीएसपीसह आणखी सहा जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. वर्ल्ड कप विनर खेळाडू अडचणीत आला आहे. कोण आहे तो खेळाडू आणि नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.
मुंबई : टीम इंडियाला वर्ल्ड जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या खेळाडूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीम इंडियाने 2007 साली टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. या वर्ल्ड कप टीममधील खेळाडूवर गुन्हा दाखल झाला आहे. एका युवकाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी माजी खेळाडू आणि तत्कालीन डीएसपीसह आणखी सहा जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आलाय. वर्ल्ड कप विनर खेळाडू अडचणीत आला आहे. कोण आहे तो खेळाडू आणि नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
हरियाणामधील हिसारामधील डाबरा गावामध्ये 27 वर्षाच्या पवन याने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पवनची आई सुनीता यांनी आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. जोगेंदर शर्मासह अजयबीर, ईश्वर झझारिया, प्रेम खाती आणि राजेंद्र सिहाग यांच्यावर आरोप केला आहे. घरावरून कोर्टात केस सुरू होती. या केसमुळे पवन कायम दबावात होता. आरोपींनी त्याला अनेकवेळा धमकावल्याचाही सुनीता यांनी म्हटलं आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.
पवन यांच्या कुटंबियांनी सीएमओ कार्यालयाबाहेर आंदोलन केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी पवनचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. पवनच्या कुटुंबियांची भेट घेत डीएसपी अशोक कुमार यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.
वर्ल्ड कपमधील जोगिंदर शर्माची मॅजिक ओव्हर
टी-वर्ल्ड कप 2007 मध्ये जोगिंदर शर्माने पाकिस्तानविरूद्धच्या फायनल सामन्यात कडक ओव्हर टाकली होती. महेंद्र सिंह धोनीने शेवटची ओव्हर जोगिंदर शर्मा याला दिली होती, धोनीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता. शेवटच्या ओव्हरमधील चार बॉलमध्येच तो हिरो झाला होता. मिसबाहने मागे मारलेला चेंडू हवेत असताना सगळ्यांनी श्वास रोखून धरला होता. पाकिस्तानची शेवटची विकेट होती, या विकेटसह भारताने विजय मिळवला होता.