Cricket : 5 ओव्हर 6 खेळाडू आणि 12 संघ, या स्पर्धेत टीम इंडियाही खेळणार
Hong Kong Cricket Sixes: हाँगकाँग क्रिकेट सिक्सेस टूर्नामेंटमध्ये एका संघात 6 खेळाडू असणार आहेत. या स्पर्धेतील सामन्यातील एका डावात एकूण 5 ओव्हरचा खेळ होईल. जाणून घ्या हटके नियम.
आयपीएलनंतर टी 20 क्रिकेटला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. देशासह परदेशात अनेक टी 20 स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आता 1 ते 3 नोव्हेंबर दरम्यान एकूण 12 संघांमध्ये 5-5 षटकांचा सामना पार पडणार आहे. हाँगकाँग क्रिकेटने सोमवारी 7 ऑक्टोबर रोजी याबाबतची माहिती दिली आहे. या स्पर्धेत टीम इंडियाही सहभागी होणार आहे. एका डावात फक्त 5 षटकं असल्याने क्रिकेट चाहत्यांना थरार अनुभवता येणार आहे. आपण या स्पर्धेचे हटके नियम जाणून घेऊयात.
3 दिवस 12 संघ
एकूण 3 दिवस या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. टीम इंडिया, पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांसह एकूण 12 संघ या स्पर्धेत भिडणार आहेत. या 3 दिवसीय स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, हाँगकाँग, नेपाळ, न्यूझीलंड, ओमान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमीराती संघ सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेतील पहिल्या हंगामाचं आयोजन हे 1992 साली करण्यात आलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा 7 वर्षांनंतर या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, शेन वॉर्न, वसीम अक्रम, शोएब मलिक, सनथ जयसूर्या, अनिल कुंबळे, उमर अकमल, ग्लेन मॅक्सवेल आणि डेमियल मार्टिन यासारखे दिग्गज खेळाडू या स्पर्धेत खेळले आहेत. या स्पर्धेत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यशस्वी ठरले आहेत. टीम इंडियाने 2005 साली या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. काही नियमांमुळे ही स्पर्धा आणखी थरारक अशी असणार आहे. ते नियम काय आहेत? हे आपण जाणून घेऊयात.
5-5 ओव्हरचा सामना
TEAMS IN HONG KONG SIXES 2024:
India, Australia, Bangladesh, Pakistan, England, Hong Kong, Nepal, New Zealand, Oman, South Africa, Sri Lanka, UAE. pic.twitter.com/QSRylHqgXp
— Johns. (@CricCrazyJohns) October 8, 2024
असे आहेत नियम
प्रत्येक संघात 6-6 खेळाडू असणार आहेत. प्रत्येकी 5-5 षटकांचा हा सामना असणार आहे.
विकेटकीपरचा अपवाद वगळता फिल्डिंग करणाऱ्या संघातील प्रत्येक खेळाडूला 1-1 ओव्हर टाकावी लागणार आहे. तर तर वाईड आणि नो-बॉलवर प्रत्येकी 2-2 धावा दिल्या जाणार आहेत.
प्रत्येक टीम 5 ओव्हर खेळणार आहे. त्याआधीच बॅटिंग करणाऱ्या टीमने 5 विकेट्स गमावल्या, तर शेवटचा (सहावा) फलंदाज एकटा बॅटिंग करेल. तर त्याला बाद झालेल्या खेळाडूंपैकी एक फलंदाज त्याला नॉन स्ट्राईकर म्हणून साथ देईल. तसेच तो एकटा खेळाडूच स्ट्राईक घेत राहिल. तो एकमेव बॅट्समन (सहावी विकेट) बाद होताच टीम ऑलआऊट होईल.