IND vs PAK : इंडिया-पाकिस्तान महामुकाबला अवघ्या काही तासांनी, जाणून घ्या केव्हा?

India vs Pakistan Hong kong Sixes 2024: खेळ कोणताही असोत, चाहत्यांना कायमच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याची कायम प्रतिक्षा असते. आता अवघ्या काही तासांनी हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने असणार आहेत.

IND vs PAK : इंडिया-पाकिस्तान महामुकाबला अवघ्या काही तासांनी, जाणून घ्या केव्हा?
india_vs_pakistan_flag
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 9:56 PM

क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा आणि तब्बल 7 वर्षांनी हाँगकाँग क्रिकेट स्पर्धेचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, इंग्लंडसह एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतील हटके नियमांमुळे सामने आणखी रंगतदार होणार हे निश्चित आहे. इतर कोणत्याही सामन्यांमध्ये प्रत्येकी संघात 11 खेळाडू असतात. मात्र या सामन्यात एका संघात 6 खेळाडूच असणार आहेत. एकूण 5 सामन्यांचा हा सामना असणार आहे. विकेटकीपर वगळता प्रत्येक खेळाडूला 1-1 ओव्हर टाकावी लागणार आहे. तसेच शेवटचा खेळाडू आऊट होईपर्यंत सामना सुरु राहणार आहे. उदाहरण, 5 विकेट गेल्यानंतर टीम ऑलआऊट होणार नाही. तर सहावा खेळाडू आऊट झाल्यानंतरच टीम ऑलआऊट होईल. तोवर सहावा फलंदाज हा एकटाच खेळत राहिल.

या अशा हटके नियमांमुळे या स्पर्धेची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. तसेच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या महामुकाबल्याकडेही साऱ्यांचं लक्ष लागून आहे. हा महामुकाबला 1 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील सहभागी 12 संघांना 3-3 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे.

सामना कुठे पाहता येणार?

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेतील सामने भारतात टीव्ही आणि मोबाईलवर पाहता येणार आहे. या स्पर्धेतील सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील. तर फॅनकोडद्वारे लाईव्ह सामन्याचा थरार अनुभवता येईल.

हाँगकाँग स्पर्धेसाठी भारतीय संघ आणि इतर माहिती जाणून घ्या

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ : रॉबिन उथप्पा (कर्णधार), केदार जाधव, मनोज तिवारी, शाहबाज नदीम, भरत चिपली, श्रीवत्स गोस्वामी आणि स्टुअर्ट बिन्नी.

हाँगकाँग सिक्सेस स्पर्धेसाठी पाकिस्तान टीम : फहीम अश्रफ (कॅप्टन), आमेर यामिन, आसिफ अली, दानिश अझीज, हुसैन तलात, मुहम्मद अखलाक आणि शाहाब खान.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.