IPL 2024 : जेतेपद मिळवणाऱ्या संघाला किती कोटी मिळणार? राजस्थान-बंगळुरुच्या वाट्याला किती आले? जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होत आहे. या स्पर्धेच्या जेतेपदासाठी गेल्या दोन महिन्यांपासून लढत सुरु होती. अखेर जेतेपदासाठी दोन संघ आमनेसामने आहेत. लिलावात कोट्यवधींची उधलण होत असताना विजेत्या संघाला किती कोटी मिळणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर बक्षिसाची रक्कम जाणून घ्या.
आयपीएल 2024 स्पर्धेतील जेतेपदाचा निकाल काही तासांमध्ये लागणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यापैकी एक संघ जेतेपदावर विजयाची मोहोर उमटवणार आहे. असं असताना विजेत्या संघाला किकी कोटी रुपये मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. बीसीसीआनये आयपीएलच्या 17 व्या पर्वासाठी 46.5 कोटी रुपयांची बक्षीर रक्कम निश्चित केली आहे. यापैकी विजेत्या संघाला 20 कोटी रुपये मिळणार आहेत. तर उपविजेत्या संघाला 13 कोटींची रक्कम मिळणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांना अनुक्रमे 7 कोटी आणि 6.5 कोटींची बक्षीस रक्कम मिळेल. विजेत्या संघाला मिळणारी 20 कोटी रुपयांची रक्कम आयपीएल वगळता इतर कोणत्याही टी20 लीगमध्ये दिली जात नाही. क्वॉलिफायर 2 फेरीत पराभूत झालेल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाला 7 कोटी रुपये मिळाले. तर एलिमिनेटर फेरीत गाशा गुंडाळावा लागलेल्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला 6.5 कोटी रुपये मिळतील.
आयपीएल 2024 स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या आणि ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या खेळाडूला 15 लाख रुपये मिळतील. सध्या 15 सामन्यात 741 धावा करणाऱ्या विराट कोहलीला हे बक्षीस मिळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्या आसपासही कोणी नाही. दुसरीकडे पर्पल कॅप असणाऱ्या गोलंदाजालाही 15 लाखांची रक्कम मिळेल. पंजाब किंग्सचा हर्षल पटेल या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 24 विकेट्स घेतल्या असून तिथे पोहोचण्यासाठी वरुण चक्रवर्थीला 5 विकेट घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही रक्कम हर्षल पटेलला मिळेल यात शंका नाही. उदयोन्मुख खेळाडूला 20 लाख मिळतील, तर सामना फिरवण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या खेळाडूला 12 लाख मिळणार आहे. तसेच या पर्वात सर्वात जबरदस्त स्ट्राईक रेट असलेल्या खेळाडूला 15 लाख मिळतील.
आयपीएल 2024 स्पर्धा पार पडल्यानंतर मेगा लिलावाची तयारी सुरु होणार आहे. आयपीएल फ्रेंचायसींना फक्त चार प्लेयर रिटेन करण्याची मुभा असेल. इम्पॅक्ट प्लेयर नियम राहणार की जाणार हा देखील प्रश्न आहे. त्यानंतर खेळाडूंचा भाव ठरणार आहे. इम्पॅक्ट प्लेयरल नियम गेला तर मात्र अष्टपैलू खेळाडूंचा भाव पुन्हा एकदा वधारेल. दोन बाउंसर टाकण्याच्या नियमामुळे वेगवान गोलंदाजांना चांगला भाव मिळाला होता. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.