चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भाग घेणाऱ्या आठ संघांना किती पैसे मिळाले? जाणून घ्या एका क्लिकवर
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना न गमवता जेतेपद पटकावलं आहे. तर न्यूझीलंडला अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसरीकडे, पाकिस्तान-बांगालदेश-अफगाणिस्तान आणि इंग्लंडचं साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं. चला जाणून घेऊत स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांना किती पैसे मिळाले ते.

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लढत झाली. हा सामना भारताने 4 गडी राखून जिंकला. भारताने तिसऱ्यांदा जेतेपद पटकावलं आहे. पहिल्यांदा सौरव गांगुलीच्या नेतृत्वात, त्यानंतर 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात जेतेपद पटकावलं होतं. भारताला 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीत जेतेपदाची संधी चालून आली होती. पण पाकिस्तानने 180 धावांनी दारूण पराभव केला होता. पण टीम इंडियाने 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीत कोणतीही चूक केली नाही. एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. या विजयानंतर टीम इंडियावर बक्षिसाच्या रुपाने पैशांचा वर्षाव झाला. भारताला या विजयानंतर जवळपास 20 कोटी 48 रुपयांची रक्कम मिळाली.
चॅम्पियन्स ट्रॉफी उपविजेत्या न्यूझीलंड संघाला बऱ्यापैकी बक्षिसी रक्कम मिळाली. टीम इंडियाच्या तुलनेत ही रक्कम निम्मी आहे. न्यूझीलंडला जवळपास 10.9 कोटी रुपये मिळाले. दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली होती. पण न्यूझीलंडकडून पराभवाच तोंड पाहावं लागलं. दक्षिण अफ्रिकेला जवळपास 5.32 कोटी रुपये बक्षिसाच्या रुपाने मिळाले. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत जास्त असून लीग स्पर्धेत दोन विजय मिळवले होते. ऑस्ट्रेलियाला भारताने उपांत्य फेरीत पराभवाची धूळ चारली. ऑस्ट्रेलिया साखळी फेरीत एकच सामना जिंकली होती. तर दोन सामने पावसामुळे रद्द झाल्याने आयते दोन गुण मिळाले. ऑस्ट्रेलियाला जवळपास 5.03 कोटी रुपये मिळाले.
अफगाणिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करत मोठा उलटफेर केला होता. पण साखळी एका सामन्यात पराभव तर एक सामना पावसामुळे वाया गेला. अफगाणिस्तानला 4.22 कोटी रुपये मिळाले. बांगलादेशने या स्पर्धेत काही खास केलं नाही. एक सामना पावसामुळे वाया गेला. तर भारत आणि न्यूझीलंडकडून पराभव सहन करावा लागला. यामुळे संघाला बक्षिसाच्या रुपाने 3.94 कोटी रुपये मिळाले.
इंग्लंडची या स्पर्धेत निराशाजनक कामगिरी राहिली. इंग्लंडने तीन पैकी तीन सामने गमावले. त्यामुळे साखळी फेरीत तळाशी असलेल्या इंग्लंडला जवळपास 2.20 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं. यजमान पाकिस्तानची या स्पर्धेत खूपच नाचक्की झाली. पहिल्यांदा न्यूझीलंडने, त्यानंतर भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. बांगलादेशविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यात अ गटात बांगलादेशच्या तुलनेत नेट रनरेट कमी होता आणि तळाशी राहावं लागलं. त्यामुळे बक्षीस म्हमून 2.20 कोटी रुपये मिळाले.