आता शब्द कशासोबत, कसे खाणार, भाजून, तापवून की चपाती, की डोशासोबत? वाचाळवीरांना आनंद महिंद्रांचा सवाल

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला आहे.

आता शब्द कशासोबत, कसे खाणार, भाजून, तापवून की चपाती, की डोशासोबत? वाचाळवीरांना आनंद महिंद्रांचा सवाल
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 4:05 PM

ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाने ब्रिस्बेन कसोटीत (Aus vs Ind 4th Test) विजय मिळवत इतिहास रचला आहे. चौथ्या कसोटी सामन्यासह टीम इंडियानं बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर कब्जा कायम ठेवला आहे. आस्ट्रेलियानं भारतासमोर विजयासाठी 328 धावांचे आव्हान ठेवलं होते. भारतानं हे आव्हान शुभमन गिलच्या 91 आणि रिषभ पंतच्या 89 धावांच्या जोरावर पूर्ण केले. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभूत होईल, असा दावा अनेक माजी क्रिकेटपटूंनी केला होता. या क्रिकेटपटूंनी भारतीय संघाचं खच्चीकरण करण्यासाठी तिखट शब्दांचा वापर केला होता. परंतु अजिंक्य रहाणेच्या नव्या दमाच्या टीम इंडियाने बॉर्डर-गावसकर चषक जिंकून सर्वांची तोंडं बंद केली आहेत. त्यामुळे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीदेखील आता या वाचाळवीर क्रिकेटपटूंवर हल्लाबोल केला आहे. (How would you like to eat your words? Grilled, fried, baked…wrapped in a chapati or dosa? Anand Mahindra’s question to Michael Vaughan, Ponting, Clarke)

ऑस्ट्रेलियन संघ बॉर्डर-गावसकर मालिका जिंकेल असा दावा करणाऱ्या वाचाळवीरांना उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरुन एक सवाल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आता तुम्ही तुमचे शब्द कशासोबत खाणार भाजून, तापवून चपातीसोबत की डोशासोबत खाणार? सोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि मायकल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ब्रॅड हॅडिन आणि मार्क वॉ यांचे फोटो आणि त्यांनी टीम इंडियाबद्दल केलेली वक्तव्ये दिसत आहेत. या सर्वांवर आनंद महिंद्रा यांनी हल्लाबोल केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना भारताने गमावल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन म्हणाला होता की, विराट कोहलीची टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये पराभूत होईल. वॉनने एक ट्विट केलं होतं, त्यात त्याने म्हटलं होतं की, “मला असं वाटतं की भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सर्व मालिकांमध्ये अत्यंत वाईट पद्धतीने पराभूत होईल”. वॉनला पाच गोलंदाजांसह मैदानात उतरणारा संघ आवडत नाही. ही जुनी मानिसिकता त्याला पटत नाही. त्याने म्हटलं की, भारतीय संघ मला जुनी रणनीति फॉलो करणारा वाटला. भारताकडे केवळ पाच गोलंदाजांचा पर्याय आहे आणि भारताची फलंदाजी फार बरी नाही. भारताला 50 षटकं गोलंदाजी करण्यासाठी चार तासांहून अधिक वेळ लागला, मला हेदेखील आवडलेलं नाही. भारतीय संघाचं क्षेत्ररक्षणही फार बरं नाही. गोलंदाजी सामान्य आहे. तर दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियन संघ मात्र जबरदस्त आहे.

भारतीय संघ अ‍ॅडलेड कसोटीत पराभूत झाला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या 36 धावांवर ऑल आऊट झाला होता. तसेच या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली मायदेशी परतला. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क म्हणाला होता की, “फलंदाजीत भारतीय संघ खूपच कमकूवत आहे. तसेच पुढील तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीदेखील या संघात नसणार. विचार करा हा संघ पुढील सामन्यात कसा खेळेल? भारतीय संघ सध्या खूप अडचणीत आहे.”

अ‍ॅडलेड कसोटी भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग म्हणाला होता की, “भारतीय संघ सध्या कमकुवत आहे. अ‍ॅडलेडमधील पराभवाने भारतीय खेळाडू बॅकफुटवर आहेत. तसेच पुढील सामन्यांमध्ये विराट कोहलीदेखील संघात नसेल. अशा वेळी भारतीय संघाला व्हाईटवॉश देण्याची नामी संधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडे आहे.” तसेच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मार्क वॉ म्हणाला होता की, “अ‍ॅडलेड कसोटीत खूप वाईट पद्धतीने हरल्यानंतर हा संघ पुन्हा कमबॅक करेल असं मला तरी वाटत नाही. या सर्व वाचाळवीरांना भारतीय संघानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे”.

संबंधित बातम्या:

Aus vs Ind 4th Test, 5th Day Live | लढले, नडले, भिडले, कांगारुंची घमेंड उतरवली, टीम इंडियाचा थरारक विजय

Aus vs Ind 4th Test | फंलदाजी करताना हातावर चेंडूचा जोरदार फटका, पुजारा मैदानात कोसळला

Aus vs Ind 4th Test: ब्रिस्बेन कसोटीतील टीम इंडियाच्या रोमांचक विजयानंतर ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणाला….

(How would you like to eat your words? Grilled, fried, baked…wrapped in a chapati or dosa? Anand Mahindra’s question to Michael Vaughan, Ponting, Clarke)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.