Wriddhiman Saha प्रकरणात माजी यष्टीरक्षकाची उडी; म्हणाला, माझ्याविरोधात चुकीच्या बातम्या छापल्या, संघातून काढून टाकलं
ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या भविष्याविषयी काही वक्तव्ये आणि ट्विट्स केले आहेत. त्याला निवृत्ती घेण्यास सांगण्यात आल्याचा दावा साहाने केला आहे. साहाचे प्रकरण ताजे असतानाच आता भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी (Syed Kirmani) यानेदेखील असेच वक्तव्य केले आहे.
मुंबई : ऋद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या भविष्याविषयी काही वक्तव्ये आणि ट्विट्स केले आहेत. त्याला निवृत्ती घेण्यास सांगण्यात आल्याचा दावा साहाने केला आहे. साहाचे प्रकरण ताजे असतानाच आता भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज सय्यद किरमाणी (Syed Kirmani) यानेदेखील असेच वक्तव्य केले आहे. किरमाणी म्हणाला जेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता तेव्हा त्याला काहीही न सांगता संघातून वगळण्यात आले होते. 1983 चा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा (Indian Cricket Team) भाग असलेल्या सय्यद किरमाणीने सांगितले की, साहाप्रमाणेच त्याच्यावरही त्याच्या कारकिर्दीत अन्याय झाला. पण त्यावर कोणी बोलत नाही.
किरमाणी यांनी स्पोर्ट्सकीडा वेबसाइटला सांगितले की, “साहासमोर खूप स्पर्धा आहे. त्याचे स्पर्धक तरुण आयपीएल आणि इतर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये चांगला खेळ करत आहेत. अर्थात तो खूप दुःखी आहे पण प्रत्येक क्रिकेटपटूला चढ-उतारातून जावे लागते. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन खेळाडूबद्दल काय विचार करतात हे आम्हाला माहित नाही. माझ्यावरही अन्याय झाला आहे पण त्यावर कोणी बोलत नाही.
दोष नसताना मला संघाबाहेर काढण्यात आले
किरमाणीने 1976 ते 1988 पर्यंत भारतासाठी 88 कसोटी आणि 49 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तो म्हणाला, प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याविरोधात मोहीम सुरू करण्यात आली होती आणि खोट्या बातम्या छापण्यात आल्या होत्या. ज्यामुळे मैदानावर मी खूप चुका करतो अशी प्रतिमा निर्माण केली होती,
त्यावेळी मी माझ्या करिअरच्या शिखरावर होतो. तरीही मला कसोटी आणि एकदिवसीय या दोन्ही संघातून कोणतीही चूक न करता वगळण्यात आले. माझ्या आजूबाजूला स्पर्धा नव्हती. मी 88 कसोटी खेळलो आणि अनेक प्रसंगी मी टीम इंडियाला अडचणीत असताना वाचवले. मी खराब कामगिरी करत असल्याच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या हे तुम्हाला माहीत आहे का? स्लीपमध्ये कोणी झेल सोडला असता तर त्यांनी माझा फोटो छापून किरमाणीने झेल सोडला आहे किंवा स्टंपिंग हुकले, असे दाखवले असते.
किरमाणी म्हणाला, “मी नेहमीच फायटर राहिलो आहे. जेव्हा मला पुनरागमन करायचे होते तेव्हा माझ्याच राज्याने (कर्नाटक) मला संघातून बाहेर फेकले होते. त्यामुळे मला रेल्वेच्या टीममध्ये जावे लागले. तेव्हा कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचा सचिव मला म्हणाला. अच्छा… तर तू रेल्वेकडे जातोयस? मी पण बघतो तू कसा खेळतोस. विश्वचषक विजेत्या खेळाडूशी कोणी असं बोलतं का?”
इतर बातम्या
IND vs SL : ‘हिटमॅन’ शर्माकडे तीन विश्वविक्रमांची संधी, विराट, धवन, गप्टिलला मागे टाकणार?
ना रोहित, ना युवराज, IND vs SL T20 मधला सिक्सर किंग कोण? पाहा हिटिंग मास्टर्सची लिस्ट
IND vs SL : दीपक चाहरपाठोपाठ विस्फोटक फलंदाज संघाबाहेर, टीम इंडिया अडचणीत