Video | कीपिंग करताना स्टंपमागे तु फार बडबडतोस, रोहितच्या प्रश्नावर रिषभ काय म्हणाला?

टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) या मालिकेत स्टंपमागून आपल्या कंमेट्रीने क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं.

Video | कीपिंग करताना स्टंपमागे तु फार बडबडतोस, रोहितच्या प्रश्नावर रिषभ काय म्हणाला?
टीम इंडियाचा विकेटकीपर रिषभ पंतने (Rishabh Pant) या मालिकेत स्टंपमागून आपल्या कंमेट्रीने क्रिकेट चाहत्यांचं मनोरंजन केलं.
Follow us
| Updated on: Mar 07, 2021 | 1:06 PM

अहमदाबाद : टीम इंडियाने इंग्लंडला चौथ्या कसोटीत (india vs england 4th test) पराभूत करत 3-1 च्या फरकाने मालिका जिंकली. यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (world test championship) अंतिम फेरीत धडक मारली. या संपूर्ण मालिकेत टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन रिषभ पंतने (rishabh pant) जलवा दाखवला. पंतने विकेटकीपिंगसह बॅटिंगनेही उल्लेखनीय कामगिरी केली. पण तो चर्चेत राहिला त्याच्या स्टंपमागील कॉमेंट्रीसाठी. पंतने आपल्या सहकाऱ्याला गोलंदाजी करताना अनेकवेळा मार्गदर्शन केलं. तसेच अनेकदा भन्नाट कॉमेंट्री केली. या सर्व बाबतीत टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने (rohit sharma) पंतला एका मुलाखतीत प्रश्न विचारला. (I am doing funny commentary to motivate Team India said Rishabh Pant)

काय म्हणाला पंत?

किपींग करताना तु स्टंपमागे फार बोलतोस, ते नक्की काय आहे, असा प्रश्न रोहितने विचारला. यावर पंत म्हणाला की, ” या मागे विशेष असं काही नाही. मी खेळताना क्रिकेटचा आनंद घेतो. तसेच यामुळे संघाचं मनोबल उंचावण्यातही हातभार लागतो. यामागे आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मी बडबडत असतो”, असं पंत म्हणाला. बीसीसीआयने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. या मुलाखतीत रोहित आणि पंतशिवाय वॉशिंग्टन सुंदरही पाहायला मिळत आहे.

हर्षा भोगलेला चोख प्रत्युत्तर

पंतने या सामन्यात केलेल्या कामगिरीमुळे मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले. पोस्ट मॅच प्रेझंटेशनच्या वेळेस कमेंटेटर हर्षा भोगले हे पंतसोबत संवाद साधत होते. यावेळेस भोगलेंनी पंतच्या स्टंपमागील कॉमेंट्रीबाबत उल्लेख केला. “तुझ्या या कॉमेंट्रीमुळे आमच्यावर टीका केली जातेय. तु किपींग करतोस तेव्हा आम्हाला कॉमेंट्री बंद करा, अंस क्रिकेट चाहते म्हणतात”, असं हर्षा गंमतीत म्हणाले. यावर पंतने हर्षाला चोख उत्तर दिलं. “आता हे माझं कौतुक आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही सुधार करा”, असं पंतने म्हटलं.

पंतने या सामन्यात पहिल्या डावात खेळताना 101 धावांची शतकी खेळी केली. हे त्याचं कारकिर्दीतील तिसरं तर भारतातील पहिलं शतक ठरलं. पंतने निर्णायक क्षणी शतकी खेळी करत टीम इंडियाचा डावच सावरल नाही, तर त्याने विजयी भूमिका पार पाडली.

2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय

रिषभ या 2021 वर्षात सातत्याने चांगली कामगिरी करतोय. त्याने ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतही अफतालून परफॉरमन्स केला होता. पंत टीम इंडियाकडून कसोटीमध्ये 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. पंतने या वर्षात आतापर्यंत एकूण 515 धावा केल्या आहेत. तर यादीत तिसऱ्या क्रमांकावर हिटमॅन रोहित शर्मा आहे. रोहितनेही 474 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या :

R Ashwin | फिरकीने कमाल, बॅटिंगने धमाल, अष्टपैलू कामगिरी करणारा अश्विन ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’

India vs England 4Th Test | अश्विन-अक्षरने इंग्लंडला लुटलं, 70 पैकी जवळपास 60 विकेट्स दोघांनाच !

Video | जेम्स अँडरसनच्या बोलिंगवर रिषभ पंतने मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का?

(I am doing funny commentary to motivate Team India said Rishabh Pant)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.