टीम इंडियाने बांगलादेशवर तिसऱ्या आणि टी20I सामन्यात 133 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने यासह हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये बांगलादेशला 3-0 अशा फरकाने क्लिन स्वीप दिला. टीम इंडियाने बांगलादेशला 298 धावांचं आव्हान दिलं होतं. बांगलादेशला या प्रत्युत्तरात 7 विकेट्स गमावून 164 धावांपर्यंतच पोहचता आलं. संजू सॅमसन हा टीम इंडियाच्या तिसऱ्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने 47 बॉवमध्ये 111 रन्स केल्या. संजूने 22 बॉलमध्ये अर्धशतक तर 40 चेंडूत शतक पूर्ण केलं. संजूने षटकारासह अर्धशतक तर चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. संजू या संपूर्ण खेळीत निर्भीडपणे खेळला. कॅप्टन सूर्यकुमार यादवने त्याला अप्रतिम साथ दिली. सूर्याने 75 तर हार्दिकने 47 धावांचं योगदान दिलं.
त्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांना बांगलादेशला 164 धावांवर रोखण्यात यश आलं. टीम इंडियाकडून रवी बिश्नोई याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मयंक यादवने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश रेड्डी या दोघांनी 1-1 विकेट घेतली. टीम इंडियाच्या मालिका विजयानंतर कर्णधार सूर्यकुमारने आनंद व्यक्त केला. तसेच सूर्या संजूबाबत काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.
“आम्ही एक टीम म्हणून खूप काही प्राप्त केलं. मला माझ्या टीममद्ये निस्वार्थी खेळाडू हवेत. आम्हाला निस्वार्थी टीम बनायचंय. हार्दिकने सांगितलं त्यानुसार आम्हाला मैदानावर आणि मैदानाबाहेरही एकमेकांच्या कामगिरीचा आनंद घ्यायचा आहे. शक्य तितका वेळ घालवायचा आहे. त्यानुसार ती मैत्री मैदानावर सुरु आहे. आम्ही थोडी मजा करत आहोत”, असं सूर्याने म्हटलं. सूर्या पोस्ट मॅच प्रेझेंटेशन दरम्यान असं म्हणाला.
“आमच्या टीम मिंटिगमध्येही हाच विषय असतो. तसेच मालिकेच्या सुरुवातीला गौतीभाईने (मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर) हेच म्हटलं होतं की संघापेक्षा कोणीही मोठा नाही. तुम्ही 99 किंवा 49 किंवा किती धावांवर खेळत असाल, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला टीमसाठी बॉल बाहेर मारायाचाय, तर तुम्हाला तसं करता यायला हवं. संजू सॅमसन यानं नेमकं तसंच केलं. मी संजूसाठी खूप आनंदी आहे”,अशा शब्दात सूर्याने संजूचं कौतुक केलं.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), परवेझ हुसेन इमान, लिटन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, तॉहिद हृदॉय, महमुदुल्ला, महेदी हसन, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान आणि तांझिम हसन साकिब.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, नितीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि मयंक यादव.