‘IPL फक्त झलक, माझं ध्येय साध्य करण्यासाठी प्राण पणाला लावेन’, Dinesh Karthik कडून ऐलान-ए-जंग
कार्तिक काय म्हणाला ते आम्ही सांगणार आहोतच, पण त्याआधी त्याची दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची कामगिरी पाहा. 16 एप्रिलच्या संध्याकाळी झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुमारे तब्बल 195 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली.
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या सामन्यांदरम्यान दिसणारी एक जाहिरात खूप लोकप्रिय होत आहे. भारतीय क्रिकेटचे मोठे स्टार्स त्या जाहिरातीचा भाग आहेत. त्या जाहिरातीची टॅग लाईन आहे, ‘लक्ष्य बड़ा हो तो कोई भी अकेला नहीं होता’ (जर ध्येय मोठं असेल तर कोणीही एकटा नसतो). यष्टीरक्षक आणि आक्रमक फलंदाज दिनेश कार्तिकचंही (Dinesh Karthik) ध्येय मोठं आहे. त्याचं हे मोठं ध्येय साध्य करण्यात तो एकटा नाही. त्याचा शानदार फॉर्म हा त्याचा साथीदार आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (Royal Challengers Bangalore) आयपीएल 2022 मध्ये खेळणारा दिनेश कार्तिक सध्या संघाची मोठी ताकद बनला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ दिनेश कार्तिकच्या त्या शानदार फॉर्मचा ताजा बळी ठरला आहे. या संघाविरुद्ध झंझावाती अर्धशतक ठोकल्यानंतर दिनेश कार्तिकने आपले मोठे लक्ष्य सर्वांसमोर उघड केले. तो म्हणाला, ‘आयपीएल 2022 ही फक्त एक झलक आहे, त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळवायचे आहे.’
कार्तिक काय म्हणाला ते आम्ही सांगणार आहोतच, पण त्याआधी त्याची दिल्ली कॅपिटल्सविरुद्धची कामगिरी पाहा. 16 एप्रिलच्या संध्याकाळी झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिकने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सुमारे तब्बल 195 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. त्याने 47 मिनिटे फलंदाजी केली आणि यादरम्यान त्याने 34 चेंडूंचा सामना करत 66 धावा केल्या. कार्तिकने आपल्या स्फोटक खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले.
“ध्येय साध्य करण्यासाठी प्राण पणाला लावेन”
सामना संपल्यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला, “माझे ध्येय मोठे आहे. ते साध्य करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. देशासाठी काहीतरी मोठं करायचं हे माझं ध्येय आहे. हा माझ्या क्रिकेट प्रवासाचा एक भाग आहे. मला पुन्हा भारतीय संघात स्थान हवे आहे आणि त्यासाठी मी माझं सर्वकाही देईन.
कार्तिकचं मोठं वक्तव्य आणि त्याचा अर्थ
दिनेश कार्तिकच्या वक्तव्यात दोन गोष्टी आहेत. आधी त्याला टीम इंडियात स्थान मिळवायचे आहे. दुसरे म्हणजे, त्याला क्रिकेटद्वारे आपल्या देशासाठी काहीतरी करायचे आहे. याचा अर्थ भारताच्या झोळीत मोठे जेतेपद टाकण्याचा त्याचा मानस आहे. साहजिकच या दोन्ही गोष्टी त्याच्या मिशन T20 विश्वचषकाबद्दल आहेत, जो या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे.
इतर बातम्या
DC vs RCB IPL Match Result: दिनेश कार्तिकच्या वादळापुढे दिल्ली उद्वस्त, बँगलोरचा चौथा ‘रॉयल’ विजय
DC vs RCB IPL 2022: Virat Kohli चं नशीब खराब, जबरदस्त RUN OUT, पहा VIDEO