SA vs IND : संजू सॅमसनने शतकासह सर्वांचं तोंड बंद केलं, म्हणाला मी……

Sanju Samson 3rd t20i Century : संजू सॅमसनच्या प्रतिक्षेवर गेल्या अनेक वर्षात अनेकदा शंका घेतली गेली. संजूलाही सातत्याने धावा करण्यात अपयश आल्याने त्याला डावलण्यात आलं. मात्र त्याने आता काही दिवसात 3 टी 20i शतकं ठोकत साऱ्यांचं तोंड बंद केलं.

SA vs IND : संजू सॅमसनने शतकासह सर्वांचं तोंड बंद केलं, म्हणाला मी......
sanju samson press conference
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 12:04 PM

टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन टी 20I क्रिकेटमध्ये सलग 2 शतक ठोकल्यानंतर सलग 2 वेळा शून्यावर बाद झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या आणि अंतिम सामन्यात संजूच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष होतं. संजूने जोहान्सबर्ग येथे विस्फोटक खेळी करत शतक ठोकलं आणि टीका करणाऱ्या साऱ्यांचं तोंड बंद केलं. संजूचं हे गेल्या 35 दिवसांमधील एकूण आणि तिसरं टी 20I शतक ठरलं. संजू यासह एका वर्षात 3 शतकं करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. संजूने 56 बॉलमध्ये नॉट आऊट 109 रन्स केल्या. संजूने या शतकानंतर मनातलं सारं काही बोलून दाखवलं.

संजू काय म्हणाला?

“माझ्यासाठी हे शतक किती महत्त्वाचं आहे हे मी आता सांगू शकत नाही. मी माझ्या कारकीर्दीत अनेकदा अपयशी ठरलोय. मी 2 शतकानंतर 2 वेळा शून्यावर बाद झालोय. मी स्वत:वर विश्वास ठेवला. मेहनत करत राहिलो आणि मी यशस्वी ठरलो. अनेकदा अपयशी ठरल्यानंतर माझ्या डोक्यात खूप काही सूरु होतं. मात्र अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या दोघांनी माझी मदत केली”, असं संजूने म्हटलं.

संजू तिलकबद्दल काय म्हणाला?

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या दोघांनी टीम इंडियासाठी टी 20I मध्ये सर्वोच्च भागीदारी केली. या दोघांनी 85 बॉलमध्ये नॉट आऊट 210 रन्सची पार्टनरशीप केली. संजूने या तिलकसोबतच्या या भागीदारीबाबत प्रतिक्रिया दिली. “मी तिलकसोबत अनेकदा भागीदारी केली आहे. तो फार युवा आहे मात्र भारतीय संघाचा भविष्य आहे. त्याच्यासोबत खेळण्याने मजा येते. मला जास्त बोलणं आवडत नाही. मी गेल्या वेळेस फार बोललो आणि 2 वेळा शून्यावर बाद झालो. त्यामुळे माझा सर्व काही साधेपणाने सुरु ठेवायचं होतं. कॅप्टनलाही माझ्याकडून अशीच अपेक्षा होती. आम्ही आनंदी आहोत कारण आम्ही यश मिळवलं”, असंही संजूने नमूद केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि वरुण चक्रवर्ती.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मार्करम (कॅप्टन), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को यान्सेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि लुथो सिपामला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.