मला फेअरवेल सामना खेळायचा होता, पण…, S Sreesanth चा निवृत्तीनंतर मोठा खुलासा

श्रीशांतने सोशल मीडियावरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याला मैदानात निवृत्ती घेता न अल्याची खंत जाणवतेय. श्रीशांतने सांगितले की, त्याने त्याच्या राज्य क्रिकेट असोसिएशनला म्हणजेच केरळ क्रिकेट असोसिएशनला (Kerala Cricket Association) निरोपाच्या सामन्याची विनंती केली होती.

मला फेअरवेल सामना खेळायचा होता, पण..., S Sreesanth चा निवृत्तीनंतर मोठा खुलासा
S Sreesanth Image Credit source: File
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 6:34 PM

मुंबई : विविध वादांमुळे नेहमीच चर्चेत असणारा भारताचा जलदगती गोलंदाज एस. श्रीशांतने (S Sreesanth) नुकतीच सर्व प्रकारच्या देशांतर्गत क्रिकेटमधून (Domestic Cricket – first-class & all formats) निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी मी माझी प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याने पुढे लिहिलं आहे की, “निवृत्तीचा (Retirement) हा निर्णय माझा एकट्याचा आहे आणि मला माहित आहे की यामुळे मला आनंद मिळणार नाही, पण माझ्या आयुष्यातील अशा वेळी योग्य निर्णय घेणे ही सन्माननीय कृती आहे. मी प्रत्येक क्षणाची कदर केली आहे.” श्रीशांतने सोशल मीडियावरुन आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्याला मैदानात निवृत्ती घेता न अल्याची खंत जाणवतेय.

श्रीशांतने सांगितले की, त्याने त्याच्या राज्य क्रिकेट असोसिएशनला म्हणजेच केरळ क्रिकेट असोसिएशनला (Kerala Cricket Association) निरोपाच्या सामन्याची विनंती केली होती. परंतु बोर्डाने त्याचं अपील फेटाळलं. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात केरळ आणि गुजरात यांच्यातील सामन्यात श्रीशांतला खेळायचे होते आणि हा त्याचा शेवटचा सामना ठरला असता.

संघ व्यवस्थापनाने मात्र 39 वर्षीय वेगवान गोलंदाजाचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला. रणजी ट्रॉफीच्या याच मोसमातून नऊ वर्षांनी श्रीशांत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये परतला. या मोसमात तो संघाचा सलामीचा सामना खेळला होता. मेघालयविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने विकेट्स घेतल्या होत्या, मात्र त्यानंतर त्याला पुढील सामन्यांमधून वगळण्यात आले.

‘मी फेअरवेल सामन्यासाठी पात्र होतो’

मल्याळम मनोरमाला दिलेल्या मुलाखतीत श्रीशांतने म्हटले आहे की, “मी रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातविरुद्ध सामना खेळण्यासाठी तयार होतो. सामन्यापूर्वी संघाच्या बैठकीत मी केरळसाठी हा माझा शेवटचा सामना असेल, असे स्पष्ट केले होते. मला वाटते की मी फेअरवेल मॅचसाठी पात्र आहे.”

श्रीशांतचे देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द

श्रीसंत केरळकडून 2020/21 च्या सीजनमध्ये खेळला होता. श्रीसंत किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोची टस्कर्स केरळकडून खेळला आहे. टी-20 स्पर्धेत 44 सामन्यात त्याने 40 विकेट घेतल्यात. 2007 च्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघाचा श्रीसंत भाग होता. श्रीसंतने 10 टी-20 सामन्यात 7 विकेट काढल्या आहेत. 65 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 54 विकेट काढल्यात.

श्रीशांतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

श्रीशांतने 27 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यात 87 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 75 बळी घेतले आहेत. त्याने 10 टी-20 सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या आहेत

पुढच्या पिढीसाठी कारकीर्द संपवण्याचा निर्णय

निवृत्तीबाबतची घोषणा करताना श्रीशांतने ट्विटमध्ये लिहिलं होते की, आजचा दिवस माझ्यासाठी कठीण आहे, पण हा दिवस चिंतन आणि कृतज्ञतेचाही आहे. Ecc, एर्नाकुलम जिल्ह्यासाठी खेळणे, वेगळे असते. लीग आणि टूर्नामेंट संघ, केरळ राज्य क्रिकेट असोसिएशन, BCCI, Warwickshire county cricket team, भारतीय एअरलाइन्स क्रिकेट संघ, बीपीसीएल आणि ICC साठी खेळणं माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.

क्रिकेटपटू म्हणून माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत, स्पर्धा, उत्कटता आणि चिकाटी या सर्वोच्च मापदंडांसह तयारी आणि प्रशिक्षण घेत असताना मी नेहमीच यश आणि क्रिकेट सामने जिंकण्याचा प्रयत्न केला आहे. माझे कुटुंब, माझे सहकारी आणि भारतातील लोकांचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. खूप दुःखाने पण खेद न बाळगता, मी जड अंत:करणाने हे सांगतो, मी देशांतर्गत (प्रथम श्रेणी आणि सर्व फॉरमॅट) क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी, मी माझी प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द संपवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझा एकट्याचा आहे आणि जरी मला माहित आहे की यामुळे मला आनंद मिळणार नाही, पण मी योग्य वेळी हा निर्णय घेत आहे, ही एक सन्माननीय कृती आहे. मी प्रत्येक क्षणाची कदर केली आहे.

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.