SL vs IND: “मला कर्णधार बनायचं नाही….”, सूर्या मालिका विजयानंतर असं का म्हणाला?
Suryakumar Yadav On Captaincy: मला कॅप्टन व्हायचं नाही, असं सूर्यकुमार यादव याने टीम इंडियाच्या श्रीलंके विरुद्धच्या तिसऱ्या टी 20i सामन्यातील विजयानंतर म्हटलं. तो असं का म्हणाला?
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय संघाने श्रीलंके विरुद्ध तिसऱ्या टी 20i सामन्यात विजय मिळवला आहे. उभयसंघात पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना पार पडला. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयसाठी 138 धावांचं आव्हान दिलं. श्रीलंकेला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 137 धावांपर्यंतच पोहचता आलं. परिणामी सामना टाय झाला. त्यानंतर सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरने लागला. भारताने सुपर ओव्हरमध्ये मिळालेलं 3 धावांचं आव्हान हे पहिल्याच बॉलवर चौकार ठोकून पूर्ण केलं आणि विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली. टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 ने क्लीन स्वीप केला. टीम इंडियाच्या या विजयानंतर कॅप्टन सूर्यकुमारने काय म्हटलं? जाणून घेऊयात.
सूर्यान काय म्हटलं?
“या खेळपट्टीवर 140 स्कोअर योग्य होता. मी खेळाडूंना सांगितलं की अशाप्रकारची स्थिती मी पाहिली आहे. जर तुम्ही मनापासून खेळता, तर आपण विजयी होऊ शकतो. खेळाडूंकडे जितकं कौशल्य आणि आत्मविश्वास आहे, त्याने माझं काम आणखी सहज होतं. खेळाडू हे एकमेकांप्रती काळजी व्यक्त करतात आणि दाखवतात, हे खरंच अविश्वसनीय आहे”, असं सूर्या सामन्यानंतर म्हणाला.
“खेळाडूंनी माझं काम फार सोपं करुन टाकलं आहे. मी जेव्हा बॅटिंगला जातो तेव्हा माझ्यावर काहीसा दबाव असतो. मी स्वत:ला बॅटिंगने व्यक्त करतो. मला कॅप्टन व्हायचं नाहीय, मला लीडर व्हायचं आहे”, असं सूर्याने सांगितलं.
सूर्या ‘मॅन ऑफ द सीरिज’
दरम्यान सूर्यकुमार यादव याची टी20i संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून पहिली मालितका होती. सूर्याने आपल्या पहिल्या नेतृत्वात भारताला विजयी केलं. सूर्याने या मालिकेत बॅटिंगसह आपल्या बॉलिगंनेही चमक दाखवली. सूर्याला या मालिकेतील तिन्ही सामन्यात केलेल्या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रियान पराग, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज आणि खलील अहमद.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षाना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.