Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

280 धावांनी मानहानीकारक पराभव, त्यानंतरही बांगलादेशच्या कर्णधाराचा माज! रोहितला इशारा देत म्हणाला…

IND vs BAN : टीम इंडियाने चौथ्या दिवसातील पहिल्या सत्रातील पहिल्या 2 तासात बांगलादेशला 6 झटके देत 280 धावांनी शानदार विजय मिळवला. बांगलादेशच्या या पराभवानंतर कर्णधार नजमूल हुसेन शांतो याने कॅप्टन रोहितला इशारा दिला आहे.

280 धावांनी मानहानीकारक पराभव, त्यानंतरही बांगलादेशच्या कर्णधाराचा माज! रोहितला इशारा देत म्हणाला...
Najmul Hossain ShantoImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 2:29 PM

रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या कसोटीत चौथ्या दिवशी 280 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली आहे. या मानहानीकारक पराभवानंतरही बांगलादेशी कर्णधाराचा माज काही कमी झालेला नाही. कॅप्टन नजमूल हुसेन शांतो याने भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला इशारा दिला आहे. उभयसंघातील दुसरा आणि अंतिम सामना हा 27 सप्टेंबरपासून कानूपर येथे होणार आहे. त्याआधी नजमूलने भारताला काय इशारा दिलाय? हे जाणून घेऊयात.

कानपूर कसोटी आमच्यासाठी महत्त्वाचं असल्याचं म्हटलं. आमचे फलंदाज कानपूरमध्ये चांगली कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त करत भारताला इशारा दिला. बांगलादेशचे फलंदाज चेन्नईतील पहिल्या कसोटीत अपयशी ठरले. टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 376 धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश 149वर ऑलआऊट झाली. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात 287 धावांवर डाव घोषित केल्याने बांगलादेशला 515 धावांचं आव्हान मिळालं. मात्र बांगलादेश चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात 23 धावांवर ऑलआऊट झाली. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात नजमूलने सर्वाधिक 82 धावा केल्या. बांगलादेच्या पराभवानंनतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशमध्ये नजमूलने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

नजमूल काय म्हणाला?

“मी कायम एक बॅट्समन म्हणून योगदान देण्याचा प्रयत्न करतो, मी कायम बॅटिंगचा आनंद घेतो. आज आम्ही शक्य तितकी बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि तसं खेळलो. कानपूर कसोटी सामना महत्त्वाचा आहे. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, फलंदाजही चांगली कामगिरी करतील”, असा विश्वास नजमूलने व्यक्त करत भारताला अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला.

गोलंदाजांचं कौतुक

दरम्यान नजमूलने बांगलादेशच्या गोलंदाजांचंही कौतुक केलं. तस्कीन आणि हसन महमूद या दोघांनी सुरुवातीच्या पहिल्या 2-3 तासात ज्याप्रकारे बॉलिंग केली, ते आमच्यासाठी सकारात्मक होतं. मात्र त्यानंतर भारताने कमबॅक केलं हे वास्तव आहे. आम्ही नव्या बॉलने चांगली बॉलिंग केली, मात्र हे असंच सुरु ठेवावं लागेल, असंही नजमूलने स्पष्ट केलं.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद आणि नाहिद राणा.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.