वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या ‘त्या’ कॅचबाबत सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला; “मी..”

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल महत्त्वाचा ठरला. मोक्याच्या क्षणी डेविड मिलरची विकेट गेली आणि सामना भारताच्या पारड्यात झुकला. सूर्यकुमार यादवने तो झेल घेताना चूक केली असती तर आज चित्र काही वेगळं असतं. या झेलबाबत सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं आहे.

वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या 'त्या' कॅचबाबत सूर्यकुमार यादवची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला; मी..
Follow us
| Updated on: Jul 01, 2024 | 9:12 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेविड मिलरने उत्तुंग फटका मारला. टीव्हीवर कॅमेरा अँगल पाहून सर्वांचीच धडधड वाढली होती. हा चेंडू थेट सीमापार गेला असा अनेकांना वाटलं होतं. पण अचानक सूर्यकुमार यादव आला आणि मिलरची विकेट घेऊन गेला. कोणाला काय झालं ते कळलंच नाही. इतक्या वेगाने ही घटना घडली. खरंतर लाईव्ह कॅमेऱ्याचा अँगलमुळे कळायला मार्ग नव्हता. पण अॅक्शन रिप्लेमध्ये सर्वकाही स्पष्ट झालं आणि तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केलं. सूर्यकुमार यादवच्या या झेलची सर्वच ठिकाणी चर्चा होत आहे. अप्रतिम झेलचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सूर्यकुमार यादव ही कामगिरी करून जेव्हा ड्रेसिंग रुममध्ये जात होता, तेव्हा टाइम्स ऑफ इंडियाने त्याला या क्षणाबाबत विचारलं. तेव्हा सूर्यकुमार यादवने सांगितलं की, “माझ्या मनात नेमकं काय सुरु होतं हे मला माहिती नाही. मला फक्त वर्ल्डकप उडताना दिसत होता आणि मी तो दोन हातात पकडला.”

वर्ल्डकप इतिहासात जेव्हा कधी सर्वोत्तम झेलची चर्चा होते तेव्हा पहिलं नाव येतं ते कपिल देवचं. त्याने 1983 वनडे वर्ल्डकपमध्ये विव रिचर्ड्सचा अप्रतिम झेल घेतला होता. सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिनी या संघात होते. सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्यांना मिळाला होता. त्यांनीही सूर्यकुमार यादवच्या झेलचं कौतुक केलं आहे. त्यांनी सांगितलं की, “सूर्याचा कॅप कपिल देव इतकाच जबरदस्त आहे. कपिल देव मागे धावत गेला आणि झेलं पकडला. हे खरंच कठीण होतं. पण सूर्याला येथे सीमेवर लक्ष ठेवून कॅच पकडण्याची कसरत करायची होती.”

क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टीके दिलीप यांनी सांगितलं की, “सूर्यकुमार यादवने 50 झेलं सरावादरम्यान पकडले होते. पण त्यावेळे सीमारेषेचं भान ठेवून चेंडू आत फेकायचा आणि परत तो आत येऊन पकडायचा त्याचा आत्मविश्वास वाखण्याजोगा आहे. त्यावेळी त्याने दाखवलेली समयसूचकता खरंच खूपच महत्त्वाची आहे. त्याबाबत सांगणं खूपच कठीण आहे.”

...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप
...म्हणून मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा, त्या क्लिपवरून दमानिया संताप.
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन
सिद्धिविनायकाला जाताय? आता असा ड्रेस कोड असेल तरच मिळणार बाप्पाच दर्शन.
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'
मुख्यमंत्र्यांना भेटल्यावर मुंडे स्पष्टच म्हणाले, '...ही माझी इच्छा'.
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट
लोकसभेपूर्वी भाजप-शिंदेंकडून ऑफर, ठाकरेंच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट.
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल
'मी बीड जिल्ह्याचा बाप, चिंता काय...'; कराडचा आणखी एक ऑडिओ व्हायरल.
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'
'लाडक्या बहिणींमुळे कोटींचा खड्डा, आता तुम्ही ठरवा मोदींच्या की...'.
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज
'अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर...', दमानियांचं चॅलेंज.
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन
एसटी भाडेवाढीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक; आज राज्यभरात आंदोलन.
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?
सिद्दीकी प्रकरणात खुलासा, हत्येपूर्वी लिहिलेल्या डायरीत कोणाची नावं?.
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च
ऑनलाईन गेमच्या नादात स्वतःचा चिरला गळा, गुगलवर एकच शब्द सतत सर्च.