‘भेटलास तर लय बेक्कार चोपेन’; शोएब अख्तरची सेहवागला धमकी
भारत आणि पाकिस्तान (Ind and Pak) यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून झालेली नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांविरोधात खेळतात.
मुंबई : भारत आणि पाकिस्तान (Ind and Pak) यांच्यातील सामन्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. सीमेवरील तणावामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून झालेली नाही. दोन्ही संघ केवळ आयसीसी स्पर्धेतच एकमेकांविरोधात खेळतात. जेव्हा-जेव्हा दोन्ही संघांमध्ये सामने झाले आहेत, तेव्हा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) हे एक मोठे आकर्षण ठरले आहे. टीम इंडिया कडून वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) पाकिस्तानविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी केली आहे. दोघेही मैदानाबाहेर चांगले मित्र असले तरी. यावेळी सोशल मीडियावर दोन दिग्गजांमध्ये युद्ध रंगले आहे. हे युद्ध मैत्रीपूर्ण आणि मजेदार आहे. सेहवागच्या एका कमेंटवर अख्तर म्हणाला की, “ज्या दिवशी सेहवाग मला भेटेल तेव्हा मी त्याला खूप मारेन.”
सेहवागची ट्विटरवर मजेशीर कमेंट
नुकताच शोएब अख्तरने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने सूट परिधान केलेला दिसत होता. अख्तरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हा एक नवीन लूक आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे.” यावर सेहवागने कमेंट केली होती, “ऑर्डर लिहून घे, एक बटर चिकन, दोन नान आणि एक बिअर.”
अख्तरचं यूट्यूब चॅनलवर उत्तर
शोएब अख्तरला अलीकडेच एका यूट्यूब चॅट शोमध्ये सेहवागच्या या कमेंटबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. हा प्रश्न येताच शोएब अख्तर हसायला लागला आणि त्याला काय बोलावे तेच समजेना. यावर तो म्हणाला की, “ज्या दिवशी मला सेहवाग भेटेल तेव्हा मी त्याला खूप मारेन.” अख्तर हे सगळं हसत आणि गमतीने म्हणत होता.
— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) March 20, 2022
दोन्ही संघांमध्ये 10 वर्षांपासून एकही मालिका झाली नाही
टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये 10 वर्षांपासून एकही द्विपक्षीय मालिका खेळवली गेली नाही. उभय संघांमधील शेवटची मालिका डिसेंबर 2012 मध्ये खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. भारतात दोन्ही संघांमधील 2 टी-20 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. तसेच पाकिस्तानने 3 वनडे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली होती.
इतर बातम्या
Women’s World Cup 2022: पूजा वस्त्राकरचा 81 मीटरचा षटकार, ठरला वर्ल्डकपमधला सर्वात लांब सिक्सर
IPL 2022 मध्ये चांगली कामगिरी करुन टीम इंडियात स्थान मिळवणार; स्पर्धेआधी शिखर धवनचा निर्धार