मला हार्ट अटॅक आला असता..! निवृत्तीनंतर कॉल हिस्ट्री शेअर करत आर अश्विन म्हणाला…

आर अश्विन आता फक्त आयपीएल आणि लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसणार आहे. कारण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. निवृत्तीनंतर त्याच्यासंदर्भात अनेक बातम्या समोर आल्या आहेत. असं असताना आर अश्विनने कॉल हिस्ट्री शेअर करत युजर्ससोबत मन की बात शेअर केली आहे.

मला हार्ट अटॅक आला असता..! निवृत्तीनंतर कॉल हिस्ट्री शेअर करत आर अश्विन म्हणाला...
Follow us
| Updated on: Dec 20, 2024 | 4:03 PM

आर अश्विन क्रिकेटविश्वातील मोठं नाव.. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा बोलबाला होता. त्याच्या आकडेवारीवरून ही बाब स्पष्ट होते. पण आता आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्याने अचानक घेतलेल्या निवृत्तीची बातमी ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. उर्वरित दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियात थांबला देखील नाही. निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियातून भारतात परतला असून आपला इतर गोष्टींमध्ये सक्रिय झाला आहे. असं असताना आर अश्विनने सोशल मीडियावर मोबाईलमधील कॉल हिस्ट्री शेअर केली आहे. ही कॉल हिस्ट्री शेअर करताना त्याला हार्ट अटॅक आला असता असं निवृत्तीनंतर सांगितलं आहे. त्यामुळे आर अश्विनच्या कॉल हिस्ट्रीबाबत क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता ताणली गेली. निवृत्तीनंतर दिग्गज खेळाडूंनी त्याला फोन केल्याचं कॉल हिस्ट्रीमध्ये दिसत आहे. अश्विनने निवृत्ती घेतल्यानंतर पहिला कॉल त्याचा वडिलांचा आला होता. या व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर आणि कपिल देव सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी फोन केला होता. अश्विनला कपिलने व्हॉट्सअॅप कॉल केला होता.

निवृत्तीनंतर आता आर अश्विन आयपीएल खेळताना दिसणार आहे. तसेच दीर्घकाळ आयपीएल खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर सचिन आणि कपिल देव सारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत बसला आहे. अश्विनने कॉल हिस्ट्री आपल्या एक्स हँडलवर शेअर करताना लिहिलं की, ‘जर कोणी 25 वर्षापूर्वी मला सांगितलं असतं की माझ्याकडे स्मार्टफोन आहे आणि त्याचा कॉल लॉग शेवटच्या दिवशी असा दिसणार आहे, तर हे ऐकून मला हार्ट अटॅक आला असता. मी यासाठी सचिन आणि कपिल पाजी याचे आभार मानतो.’

आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत 765 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन कसोटी सामने झाल्यानंतर त्याने निवृत्ती घोषित केली. तीन पैकी एका कसोटी सामन्यात त्याला खेळण्याची संधी मिळाली. खेळलेल्या शेवटच्या कसोटीत एक विकेट घेण्यात यश आलं. त्यानंतर गाब्बा कसोटीत आर अश्विनला संघात स्थान मिळालं नाही आणि सामना संपल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली.

'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.