आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आयसीसीच्या या स्पर्धेत 20 संघ सहभागी होणार आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेला स्पर्धेच्या यजमानपदाचा मान मिळाला आहे. टी 20 वर्ल्ड कपसाठी प्रमुख संघांनी 1 मे पर्यंत आपल्या पथकाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीच्या या घोषणेमुळे टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे. नक्की काय झालं ते जाणून घेऊयात.
आयसीसीने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी अंपायर आणि मॅच रेफरीजची घोषणा केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसीने एकूण 20 अंपायर्स आणि 6 मॅच रेफरीजची वर्ल्ड कपसाठी नावं घोषित केली आहेत. आयसीसीने भारतातून दोघांना पंच म्हणून स्थान दिलंय. नितीन मेनन आणि जयरामन मदनगोपाल हे पंचगिरी करणार आहेत. तर सामनाधिकारी म्हणून जवागल श्रीनाथ यांचा समावेश केला आहे. या पंचांवर आणि सामनाधिकाऱ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. तसेच आयसीसीने जाहीर केलेल्या पंचांच्या यादीतील एका नावामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियासाठी अनलकी ठरलेल्या रिचर्ड केटलबरो यांचाही पंच म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
रिचर्ड केटलबरो टीम इंडियाच्या आयसीसी स्पर्धेच्या विविध 6 नॉक आऊट स्पर्धेत अंपायर राहिले. टीम इंडियाचा या सहाच्या सहा सामन्यात पराभव झाला. टीम इंडियाच्या पराभवाला रिचर्ड केटलबरो जबाबदार नव्हते. मात्र केटलबरो अंपायर असले की टीम इंडिया पराभूत होते, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. टीम इंडिया आधी 6 वेळा पराभूत झालीय.त्यात आता पुन्हा केटलबरो यांचं नाव टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या यादीत अंपायर म्हणून आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी नको ती भीती व्यक्त केली आहे.
वर्ल्ड कपसाठी अंपायर्स : ख्रिस ब्राउन, कुमार धर्मसेना, ख्रिस गॅफनी, मायकेल गॉफ, एड्रियन होल्डस्टॉक, रिचर्ड इलिंगवर्थ, अल्लाउद्दीन पालेकर, रिचर्ड केटलबरो, जयरामन मदनगोपाल, नितीन मेनन, सॅम नोगाज्स्की, अहसान रझा, रशीद रियाझ, पॉल रीफेल, शाह रीफेल, लाइंग रॉइड्स, लांग्टन रॉडनी टकर, ॲलेक्स व्हार्फ, जोएल विल्सन आणि आसिफ याकूब.
सामनाधिकारी: डेव्हिड बून, जेफ क्रो, रंजन मदुगले, अँड्र्यू पायक्रॉफ्ट, रिची रिचर्डसन आणि जवागल श्रीनाथ.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान