4 वर्ष आणि 400+ सामने, आयसीसीकडून वेळापत्रक जाहीर, भारताचं शेड्यूल पाहा
Ftp Full Form in Cricket: आयसीसीने वूमन्स क्रिकेटसाठी 2025 ते 2029 पर्यंत फ्यूचर टूर प्रोग्रॅमची घोषणा केली आहे. टीम इंडियाला या वर्षांमध्ये अनेक दौरे करायचे आहेत. पाहा भारतीय संघाचं वेळापत्रक
क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने सोमवारी 4 नोव्हेंबरला वूमन्स क्रिकेटचं पुढील 4 वर्षांसाठीचं (2025-2029) वेळापत्रक (Future Tours Programme) जाहीर केलं आहे. आयसीसीने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार, टीम इंडियाला भरगच्च शेड्युल असल्याचं स्पष्ट होतं आहे. एफटीपीमध्ये 11 व्या संघाच्या रुपात नुकतंच झिंबाब्वेचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया मायेदशातील मालिकांव्यतिरिक्त अनेक दौरे करणार आहे.
वूमन्स टीम इंडिया फक्त द्विपक्षीय नाही, तर त्रिपक्षीय मालिकाही खेळणार आहे. ही मालिका आगामी टी 20 वर्ल्ड कप 2026 आधी खेळवण्यात येणार आहे. ही मालिका टी 20 वर्ल्ड कपच्या अनुषगांने फार महत्त्वाची आणि निर्णायक ठरणार आहे. “सदस्य देशांनी अधिकाअधिक कसोटी सामने खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि विंडिज तिन्ही प्रकारात खेळण्यासाठी तयार आहेत”, असं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
400 पेक्षा अधिक सामने
एफटीपीनुसार, 4 वर्षांमध्ये 400 पेक्षा अधिक सामने खेळवण्यात येणार आहेत. एकूण 44 एकदिवसीय मालिकांमध्ये 132 सामने होणार आहेत. तर याच 400 सामन्यांमध्ये आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2025 (भारत), टी 20 वर्ल्ड कप 2026 (ब्रिटेन) आणि टी 20 वर्ल्ड कप 2028 स्पर्धेचाही समावेश आहे.
टीम इंडियाचं वेळापत्रक साल 2025
विरुद्ध आयर्लंड, 3 एकदिवसीय सामने, जानेवारी
इंग्लंड दौरा, 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामने, जून-जुलै
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 3 एकदिवसीय सामने, सप्टेंबर
विरुद्ध बांगलादेश, प्रत्येकी 3-3 एकदिवसीय आणि टी 20 सामने, डिसेंबर
साल 2026
ऑस्ट्रेलिया दौरा, 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी 2i सामने, फेब्रुवारी
टी 20i ट्राय सीरिज, विरुद्ध इंग्लंड आणि न्यूझीलंड, मे
इंग्लंड दौरा, 1 कसोटी सामना, जुलै
विरुद्ध झिंबाब्वे, 3 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामने, ऑक्टोबर
दक्षिण आफ्रिका दौरा, 1 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 3 टी 20i सामने
साल 2027
टी 20i ट्राय सीरिज, विरुद्ध ऑस्ट्रेलिया-श्रीलंका, मे-जून
आयर्लंड दौरा, 3-3 एकदिवसीय-टी 20i मालिका, जुलै
विरुद्ध श्रीलंका, 3-3 एकदिवसीय-टी 20i मालिका, सप्टेंबर
न्यूझीलंड दौरा, 3-3 एकदिवसीय-टी 20i मालिका, ऑक्टोबर
विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 1 कसोटी आणि 3-3 एकदिवसीय-टी 20i मालिका
साल 2028
विंडिज दौरा, 3 एकदिवसीय सामने, जून
टी 20i ट्राय सीरिज, विरुद्ध ऑस्ट्रेलिया-विंडिज, जुलै
विरुद्ध इंग्लंड, 1 कसोटी आणि 3-3 एकदिवसीय-टी 20i मालिका, डिसेंबर