Icc World Cup | आयसीसी वर्ल्ड कप 2023 साठी टीमची घोषणा
आयसीसीने 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम टीम जाहीर केली आहे. आयसीसीने याबाबतची माहिती ट्विट करुन दिली आहे.
मुंबई | ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा आयसीसी वूमन्स टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळवला. आफ्रिकेला विजयासाठी 157 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 137 धावाच करता आल्या. या पराभवासह आफ्रिकेचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं. या स्पर्धेच्या समारोपानंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध संघातील खेळाडूंचा या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.
या टीममध्ये चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टीमचे 4 खेळाडू आहेत. उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेचे 3 जण आहेत. विंडिज आणि इंग्लंडचे प्रत्येकी 2 खेळाडू आणि 1 प्रतिनिधी आहे. टीम इंडियाच्या एकाच खेळाडूची निवड करण्यात आली आहे. तर आयर्लंडचाही एक प्रतिनिधी आहे. मात्र त्याचा 12 वा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीकडून सर्वोत्तम टीम जाहीर
How strong is this team?! ?
The @upstox Most Valuable Team from the ICC Women's #T20WorldCup is out! ?
More ? https://t.co/06BcjMDZLP pic.twitter.com/PwqcpYgshL
— ICC (@ICC) February 27, 2023
टीम इंडियाकडून रिचा घोष हीला संधी
आयसीसीने या टीममध्ये टीम इंडियाकडून रिचा घोष हीची निवड केली आहे. आयसीसी ‘प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’ या पुरस्कारासाठी एकूण 9 जणांना नामांकन देण्यात आलं होतं. यामध्ये रिचाचाही समावेश होता.
टीम इंडियाकडून विकेटकीपर बॅट्समन रिचा घोष हीची निवड करण्यात आली. टीम इंडियाचं वर्ल्ड कपमधील आव्हान हे सेमीफायनलमध्ये संपुष्टात आलं. मात्र टीम इंडियाला तिथवर पोहचवण्यात रिचाची निर्णायक भूमिका राहिली.
रिचाची साखळी फेरीतील कामगिरी
टीम इंडिया साखळी फेरीत अनुक्रमे पाकिस्तान, विंडिज, इंग्लंड आणि आयर्लंड या 4 टीम विरुद्ध भिडली. या 4 पैकी आयर्लंडचा अपवाद वगळता रिचाने 3 सामन्यात बॅटिंगने धमाका केला.
रिचाने पाकिस्तान विरुद्ध 20 बॉलमध्ये नाबाद 31 धावा केल्या होत्या. यामध्ये 5 खणखणीत चौकारांचा समावेश होता. तसेच विंडिज विरुद्ध 32 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 44 धावांची खेळी केली.रिचाने टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना चौकार ठोकत शानदार फिनिशिंग टच दिला होता.
तर इंग्लंड विरुद्ध 34 बॉलमध्ये 4 चौकार आणि 2 सिक्समध्ये 47 धावांची खेळी केली. मात्र रिचा आयर्लंड विरुद्ध अपयशी ठरली. रिचा आयर्लंड विरुद्ध पहिल्याच बॉलवर आऊट झाली होती. मात्र रिचाला सेमीफायनलमध्ये धमाका करता आला नाही. रिचाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 14 धावा केल्या. अशा प्रकारे रिचाने वर्ल्ड कपमधील 5 सामन्यांमध्ये 136 धावा केल्या. तसेच शानदार विकेटकीपींगही केली.
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप टीम
नेट साइवर-ब्रंट (कॅप्टन) (इंग्लंड), ताजमिन ब्रिट्स (साउथ अफ्रीका), एलिसा हीली (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्डट (साउथ अफ्रीका), एशलेग गार्डनर (ऑस्ट्रेलिया), रिचा घोष, सोफी एक्लेस्टोन (इंग्लँड), करिश्मा रामहरॅक, शबनम इस्माइल (साउथ अफ्रीका), डार्सी ब्राउन (ऑस्ट्रेलिया), मेगन शुट्ट (ऑस्ट्रेलिया) आणि ओरला प्रेंडरगैस्ट (आयर्लंड, 12वी खेळाडू).