World Cup 2023 | ICC कडून वर्ल्ड कपसाठी Prize Money जाहीर, विजेत्या टीमला किती कोटी?
ICC World Cup 2023 Prize Money | वर्ल्ड कप जिंकणारी टीम मालामाल होणार आहे. तसेच उपविजेत्या संघालाची घसघशीत रक्कम मिळणार आहे. जाणून घ्या आयसीसीने वर्ल्ड कपसाठी बक्षिस रक्कम किती ठेवलीय?
मुंबई | यंदा भारतात 12 वर्षांनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 टीम खेळणार आहेत. वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. स्पर्धेतील सलामीचा आणि अखेरचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. वर्ल्ड कपचा थरार हा एकूण 45 दिवस रंगणार आहे. या 45 दिवसांमध्ये एकूण 48 सामने पार पडणार आहे. वर्ल्ड कपला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी आयसीसी मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने वर्ल्ड कपसाठी प्राईज मनीची घोषणा केली आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
वर्ल्ड कप विजेत्या टीमला किती बक्षिस?
आयसीसी वनडे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला बक्षिस रक्कम म्हणून 4 मिलियन अमेरिकी डॉलर देण्यात येणार आहे. इतकंच नाही, तर उपविजेत्या संघालाही बक्षिस मिळणार आहे. उपविजेत्या टीमला 2 मिलियन अमेरिकी डॉलर दिले जाणार आहेत. सोप्या भाषेत सांगायचं तर वर्ल्ड कप विनर टीमला 33 कोटी 17 लाख रुपये दिले जाणार आहेत. तर रनर अप टीमला 16 कोटी 58 लाख रुपये मिळतील.
तसेच साखळी फेरीतील 1 सामना जिंकल्यास 40 हजार डॉलर देण्यात येणार आहेत. तसेच साखळी फेरीनंतर वर्ल्ड कपमधून बाहेर होणाऱ्या टीमला 1 लाख डॉलर देण्यात येतील. सेमीफायनलसाठी एकूण 4 संघ पात्र ठरतील. या प्रत्येकी 1 टीमला 8 लाख डॉलर मिळतील.
10 टीम 1 ट्रॉफी
वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या 8 संघांनी वर्ल्ड कपसाठी थेट क्वालिफाय केलं. तर श्रीलंका आणि नेदरलँड या दोन्ही संघांनी आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायरमधून वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. या 10 संघांपैकी 8 संघांनी वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली आहे. तर श्रीलंका आणि बांगलादेशने अजून संघाची घोषणा केलेली नाही.
महामुकाबल्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक
दरम्यान वर्ल्ड कपमधील एका सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. वर्ल्ड कपमध्ये 14 ऑक्टोबरला टीम इंडिया-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. या सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.