Icc Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 15 ते 26 जानेवारी दरम्यान भारतात, आयसीसीची घोषणा

Icc Announces Champions Trophy 2025 Tour Schedule : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Icc Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी 15 ते 26 जानेवारी दरम्यान भारतात, आयसीसीची घोषणा
Icc Champions TrophyImage Credit source: Andrew Matthews/PA Images via Getty Images
Follow us
| Updated on: Nov 16, 2024 | 3:30 PM

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला शेजारी आणि यजमान पाकिस्तानही टीम इंडियासाठी माघार घेण्यास तयार नाही. आयसीसीने पाकिस्तानसमोर हायब्रिड मॉडेलचा प्रस्ताव ठेवला. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अद्याप त्याबाबत काहीच कळवण्यात आलेलं नाही. पाकिस्तानच्या या आडमुठेपणामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करणं लांबवणीवर पडलं आहे. अशात क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी घोषणा केली आहे.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने चॅम्पियन्स ट्रॉफी टूर शेड्यूल जाहीर केलं आहे. आयसीसीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यानुसार, एकूण 8 देशांमध्ये ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फिरवण्यात येणार आहे. या ट्रॉफी टूरला आज 16 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तानमध्ये 16 ते 25 पर्यंत ट्रॉफी टूर होणार आहे. पाकिस्तानमधील विविध शहरांमध्ये ही ट्रॉफी फिरवण्यात येणार आहे.

पाकिस्ताननंतर, अफगाणिस्तान, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि अखेरीस भारत असा या ट्रॉफीचा प्रवास असणार आहे. आयसीसीने प्रसिद्धीपत्रकात कोणत्या देशात कोणत्या तारखेला ट्रॉफी टूर असेल, याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

ICC Champions Trophy Tour - Itinerary

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर

भारतात 15 ते 26 जानेवारी दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी

दरम्यान भारतात 15 ते 26 जानेवारी दरम्यान ट्रॉफी टूर आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार आता भारतातील कोणत्या मुंबईसह इतर कोणत्या शहरांमधील क्रिकेट चाहत्यांना ही ट्रॉफी पाहता येईल? याची प्रतिक्षा क्रीडा प्रेमींना लागली आहे.

स्पर्धेच्या वेळापत्रकाची प्रतिक्षा

एका बाजूला आता ट्रॉफी टूरचं वेळापत्रक जाहीर झालंय. मात्र क्रिकेट चाहत्यांना स्पर्धेच्या वेळापत्रकाचे वेध लागले आहेत. बीसीसीआय विरुद्ध पीसीबी यांच्यातील महामुकाबल्यामुळे कट्टर संघातील सामना हा कुठे होणार? याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेतील अव्वल 8 संघ (यजमान पाकिस्तानसह) हे चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरले आहेत. अफगाणिस्तानची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पात्र ठरण्याची ही पहिलीच वेळ आहे. अफगाणिस्ताने गेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेला पराभूत केलं होतं. त्यांनी याच कामगिरीच्या जोरावर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या 8 मध्ये स्थान कायम राखलं आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचं तिकीट मिळवलं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.