चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानची धाकधूक वाढली, भारताने अंतिम फेरी गाठली तर..

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक अखेर समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतलेली आडमुठी भूमिका अखेर सोडावी लागली आहे. ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. असं असताना या स्पर्धेच्या अंतिम फेरीआधीच पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक जाहीर होताच पाकिस्तानची धाकधूक वाढली, भारताने अंतिम फेरी गाठली तर..
Follow us
| Updated on: Dec 24, 2024 | 8:05 PM

आयसीसीने पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. 19 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता दीड महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. पहिलाच सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. साखळी फेरीचे 19 फेब्रुवारीपासून 2 मार्चपर्यंत सलग होणार आहेत. 4 आणि 5 मार्चला उपांत्य फेरीचे सामने होतील. तर अंतिम फेरीचा सामना 9 मार्चला होणार असून 10 मार्च हा दिवस राखीव ठेवला आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशची 20 फेब्रुवारीला होणार आहे. असं सर्व काही असताना पाकिस्तानचं टेन्शन अंतिम फेरीपूर्वी वाढलं आहे. पाकिस्तानच्या आयोजन एका झटक्यात पाण्यात जाऊ शकतं. यासाठी भारताला अंतिम फेरी गाठणं आवश्यक आहे. नेमकं असं काय झालं की पाकिस्तानची अवस्था बिकट होईल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी एकूण 8 संघ आहेत. अ गटात पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ आहेत. तर ब गटात दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड हे संघ आहेत.

साखळी फेरीत भारताचे पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध सामने होणार आहेत. भारत या संघाशी साखळी फेरीत प्रत्येकी एक सामना खेळणार आहे. हे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना दुबईत होईल. तर दुसरा सामना लाहोरमध्ये होणार आहे. इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. खरं तर उपांत्य फेरीत भारत पाकिस्तान सामना होणार नाही. कारण दोन्ही संघ एकाच गटात आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीत दोन्ही संघ पोहोचल्यानंतर आमनेसामने येणार नाहीत. पण दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठली तर पाकिस्तानची गोची होईल. कारण हा सामना दुबईत होईल.

आयसीसीने वेळापत्रक जाहीर करतानाच अंतिम फेरीबाबत सर्वकाही स्पष्ट केलं आहे. अंतिम फेरीचा सामना लाहोरमध्ये होईल. पण भारताने अंतिम फेरी गाठली तर हा सामना दुबईत होईल. मग अंतिम फेरीत पाकिस्तानचा संघ असला तरी तसंच असेल. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं मोठं नुकसान होणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक

  • 19 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची, पाकिस्तान
  • 20 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई
  • 21 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची, पाकिस्तान
  • 22 फेब्रुवारी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर, पाकिस्तान
  • 23 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई
  • 24 फेब्रुवारी: बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी, पाकिस्तान
  • 25 फेब्रुवारी : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी, पाकिस्तान
  • 26 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर, पाकिस्तान
  • 27 फेब्रुवारी: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी, पाकिस्तान
  • 28 फेब्रुवारी: अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर, पाकिस्तान
  • 1 मार्च: दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची, पाकिस्तान
  • 2 मार्च: न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई
  • 4 मार्च: सेमीफायनल 1, दुबई
  • 5 मार्च: सेमीफायनल 2, लाहोर, पाकिस्तान
  • 9 मार्च: फायनल, लाहोर (भारत पात्र ठरला तर दुबईमध्ये खेळला जाईल)
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.