ICC World Cup 2023 Qualifiers | झिंबाब्वे क्वालिफायरमधून ‘आऊट’, वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न भंगलं
Zimbabwe vs Scotland | झिंबाब्वेची या स्पर्धेत धडाक्यात सुरुवात झालेली. मात्र झिंबाब्वेने ऐन क्षणी कच खाल्ली आणि बाजार उठला. त्यामुळे विंडिजनंतर झिंबाब्वेचं वर्ल्ड कप क्वालिफायरमधून पॅकअप झालंय.
हरारे | आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धेतून 2 वेळा वर्ल्ड कप जिंकेलली वेस्ट इंडिज टीम बाहेर पडली. विंडिजच्या या पराभवामुळे क्रिकेट विश्वाला झटका लागला. स्कॉटलँडने वेस्ट इंडिजनंतर झिंबाब्वेचं स्वप्नभंग केलं. मंगळवारी झिंबाब्वे विरुद्ध स्कॉटलँड यांच्यात सामना पार पडला. झिंबाब्वेला सुपर 6 फेरीत आधी श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे वर्ल्ड कप मुख्य स्पर्धेत पोहचण्यासाठी झिंबाब्वेला कोणत्याही परिस्थितीत स्कॉटलँड विरुद्धचा सामना जिंकणं भाग होतं. थोडक्यात काय तर झिंबाब्वेसाठी हा ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. या आरपारच्या सामन्यातच स्कॉटलँडने झिंबाब्वेचा टांगा पलटी केला. त्यामुळे स्कॉटलँडने वेस्ट इंडिजनंतर झिंब्बावेला वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पात्र होण्यापासून रोखलं. झिंबाब्वेचा या पराभवामुळे आपल्या घरातच वर्ल्ड कपमध्ये पोहचण्याची इच्छा अधुरी राहिली.
स्कॉटलँडने झिंबाब्वेवर 31 धावांनी विजय मिळवला. झिंबाब्वेने टॉस जिंकून स्कॉटलँडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. स्कॉटलँडच्या काहींचा अपवाद वगळता सर्वांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र एकालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र त्यानंतरही स्कॉलँडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 234 धावा केल्या. त्यामुळे झिंबाब्वेला 235 धावांचं आव्हान मिळालं.
झिंबाब्वेची 235 धावांचा पाठलाग करताना खराब सुरुवात झाली. झिंबाब्वेने पहिल्याच बॉलवर विकेट टाकली. स्कॉटलँडने या दणकेदार सुरुवातीनंतर झिंबाब्वेला ठराविक अंतराने झटके दिले. झिंब्बावेकडून राय बर्ल याने 83 आणि वेस्ली माधवेरे याने 40 धावांची खेळी केली. मात्र यादोघांशिवाय कुणालाही मोठी किंवा निर्णायक खेळी करता आली नाही. झिंबाब्वेच्या टॉप आणि लोअर ऑर्डरने सपशेल निराशा केली.
झिंबाब्वेने खराब सुरुवातीनंतरही चांगली लढत दिली. मात्र अवघ्या 31 धावांमुळे झिंबाब्वेचं वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. स्कॉटलँडच्या गोलंदाजांनी झिंबाब्वेला 41.1 ओव्हरमध्ये 203 धावांवर ऑलआऊट केलं. झिंबाब्वेचं अशाप्रकारे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलं.
स्कॉटलंडने विंडिजनंतर झिंबाब्वेचा बाजार उठवला
After Zimbabwe's heartbreaking exit, two teams remain in the race for the final #CWC23 spot ?
Read more about the Super Six scenarios ?https://t.co/wwn8dykSpg
— ICC (@ICC) July 4, 2023
झिंबाब्वेची 2018 सारखी अवस्था
झिंबाब्वेचं 2018 साली अशाचप्रकारे वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न अधुरं राहिलं होतं. तेव्हा झिंबाब्वेचा वर्ल्ड कप क्वालिफायरमध्येच बाजार उठला होता. तर 2019 मध्ये वर्ल्ड कप खेळण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला होता. झिंबाब्वेला 2018 आणि आता 2023 मध्ये वर्ल्ड कपमध्ये पोहचण्यासाठी 2 पैकी 1 सामन्यात विजय मिळवायचा होता. मात्र झिंबाब्वेने तेव्हा आणि आता माती खात स्वत:ला वर्ल्ड कप खेळण्यापासून दूर ठेवलं.
एका जागेसाठी कडवी झुंज
दरम्यान झिंबाब्वेच्या विजयामुळे एका जागेसाठी 2 संघांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. स्कॉटलँडला चौथ्यांदा वर्ल्ड कपमध्ये पात्र होण्यासाठी आता फक्त एका विजयाची गरज आहे. तर नेदरलँडलाही संधी आहे. पण नेदरलँडला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.
एका जागेसाठी आरपारचा सामना हा 6 जुलै रोजी होणार आहे. या सामन्यात नेदरलँड विरुद्ध स्कॉटलँड आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात कोणती टीम जिंकते, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
झिंबाब्वे प्लेइंग इलेव्हन | जॉयलॉर्ड गुम्बी (विकेटकीपर), क्रेग एर्विन (कॅप्टन), इनोसंट काईया, शॉन विल्यम्स, सिकंदर रझा, रायन बर्ल, वेस्ली माधेवेरे, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, तेंडाई चतारा आणि ब्लेसिंग मुझाराबानी.
स्कॉटलँड प्लेइंग इलेव्हन | रिची बेरिंग्टन (कर्णधार), क्रिस्टोफर मॅकब्राइड, मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, टॉमस मॅकिंटॉश, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट, सफियान शरीफ आणि ख्रिस सोल.