Equal Prize ICC Events : उशिरा आलेलं शहाणपण, आयसीसीने महिला क्रिकेटबाबत अखेर ‘तो’ निर्णय घेतलाच!

Equal Prize Money Announced For ICC Events : आयसीसीने क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिला क्रिकेटकडे (Equal Prize Money Announced For ICC Events) पाहण्याचा दृष्टीकोण बदलू शकतो.

Equal Prize ICC Events : उशिरा आलेलं शहाणपण, आयसीसीने महिला क्रिकेटबाबत अखेर 'तो' निर्णय घेतलाच!
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 9:37 PM

मुंबई : आयसीसीने क्रिकेटच्या इतिहासामधील सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महिला क्रिकेटकडे (Equal Prize Money Announced For ICC Events) पाहण्याचा दृष्टीकोण बदलू शकतो. आयसीसीच्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत असून बीसीसीसआयचे सचिव जय शहा यांनीही या निर्णयाचं कौतुक केलं आहे. डर्बन येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) वार्षिक बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला आहे.

नेमका काय आहे निर्णय?

आयसीसी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत आता महिला आणि पुरूषांना बक्षिसात मिळणारी रक्कम ही समान राहणार आहे. पुरुषांच्या स्पर्धांमध्ये मिळणाऱ्या बक्षीस रकमेप्रमाणेच महिलांच्या स्पर्धांमध्येही बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. 2030 पर्यंत ही रक्कम सारखी देण्यात येणार आहेत. टी-20, एकदिवसीय आणि आयसीसीच्या इतर सर्व स्पर्धांमध्ये विजेत्या संघाला मिळणारी रक्कम सारखीच असणार आहे.

आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी या निर्णयाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा आमच्यासाठी ऐतिहासिक आणि मोठा निर्णय आहे. आम्हाला आनंद आहे की आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये महिला आणि पुरूष खेळाडूंना बक्षिसाची रक्कम एकसारखीच असणार आहे. 2017 पासून आम्ही समान बक्षिसाच्या रकमेसाठी दरवर्षी आम्ही महिलांच्या इव्हेंटची रक्कम वाढवल्याचंग्रेग बार्कले म्हणाले.

जय शहा काय म्हणाले?

या निर्णयाने मला खूप आनंद झाला असून महिला आणि पुरूष महिला संघामधील भेदभाव संपला आहे. दोन्ही संघ एकत्र पूढे जातील. या निर्णयाबद्दल आयसीसीच्या बोर्डामधील सर्व सदस्यांचे आभार, असं ट्विट जय शहा यांनी केलं आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे याआधी जो काही भेदभाव केला जात होता तो आता संपेल. मुलीच्या हातात संसाराचा गाडा नाहीतर बॅट आणि बॉल पालक स्वत: देतील. आयीसीच्या या निर्णयामुळे एक नवी क्रांती घडेल.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.