दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव आता आयसीसीकडून टीम इंडियाला दणका, काय केलं ते वाचा

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना दक्षिण अफ्रिकेने जिंकला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पराभवाचं झळ सहन करत असतानाच आयसीसीने टीम इंडियाला दंड ठोठावला आहे. यामुळे भारताचं नुकसान झालं आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दारुण पराभव आता आयसीसीकडून टीम इंडियाला दणका, काय केलं ते वाचा
Team india vs south africa secod test Match
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 4:37 PM

मुंबई : दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला आहे. भारताला एक डाव आणि 32 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भारताचा दक्षिण अफ्रिकेतील आतापर्यंतचा लाजिरवाणा पराभव आहे. पराभवाचं झळ सहन करत असताना आयसीसीनेही दणका दिला आहे. टीम इंडियाच्या मॅच फीमधून दहा टक्के आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतून दोन गुण कापले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी प्रत्येक गुण महत्त्वाचा असताना आयसीसीच्या कारवाईमुळे टीम इंडिया बॅकफूटवर आली आहे. इतकंच काय तर पराभव आणि दोन गुण कापल्याने थेट सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानही गुणतालिकेत पुढे असल्याने भारताचं टेन्शन वाढलं आहे. स्लो ओव्हर रेटचा फटका टीम इंडियाला बसला. ठरलेल्या वेळेपेक्षा षटकं कमी टाकल्याचा टीम इंडियावर ठपका आहे.

आयसीसीने शुक्रवारी 29 डिसेंबर 2023 रोजी सांगितलं की, “आयसीसी एलीट पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी टीम इंडियाला दंड ठोठावला आहे. भारताने ठरलेल्या वेळेपेक्षा दोन षटकं कमी टाकली.भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने चूक कबूल केली आहे. त्यामुळे याबाबत सुनावणी घेण्याची गरज पडली नाही” आयसीसीच्या नियमानुसार प्रत्येक षटकासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एक गुण आणि सामना फीच्या 5 टक्के रक्कम कापली जाते. त्यामुळे एक षटकही ठरलेल्या वेळेपेक्षा कमी टाकल्यास महागात पडू शकतं. याचा सर्वाधिक फटका हा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला बसला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दक्षिण अफ्रिका एका विजयानेच अव्वल स्थानी पोहोचली आहे. दक्षिण अफ्रिकेची विजयी टक्केवारी 100 आहे. आतापर्यंत 2023-2025 साखळी फेरीतील एकच सामना खेळल्याने विजयी टक्केवारी 100 आहे. दुसऱ्या सामन्यात निकालावर आता अव्वल स्थान राहतं की जातं ते कळेल. तर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश विजयी टक्केवारी 50 सह संयुक्तिकरित्या दुसऱ्या स्थानी आहेत. तर पाकिस्तान 45.83 विजयी टक्केवारीसह पाचव्या, तर 38.89 विजयी टक्केवारीसह भारत सहाव्या स्थानावर आहे.  वेस्ट इंडिज सातव्या, इंग्लंड आठव्या, तर श्रीलंका नवव्या स्थानावर आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.