IND vs AUS | टीम इंडिया-ऑस्ट्रेलियात पुन्हा लढाई, आयसीसीची मोठी घोषणा
आयसीसीच्या निर्णयामुळे वर्ल्ड कप फायनलनंतर पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांना टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. आयसीसीने थेट सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबई | 13 व्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चितपट केलं. ऑस्ट्रेलियाने या महाअंतिम सामन्यात टीम इंडियाचा धुव्वा उडवत सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. याच कांगारुंनी जून महिन्यात टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्य नमवलं होतं. त्यानंतर वर्ल्ड कपमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलियाच टीम इंडियावर वरचढ ठरली. टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत सलग 10 सामने जिंकून फायनलपर्यंतचा प्रवास गाठला होता. मात्र एक सामन्यातील पराभवसह टीम इंडियाने वर्ल्ड कपही गमावला. त्यानंतर आता आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.
वर्ल्ड कपनंतर आता पुन्हा एकदा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया अशी लढाई होणार आहे. मात्र ही खेळाडू सांघिक पातळीवर नाही, तर वैयक्तित पातळीवर होणार आहे. टीम इंडियाच्या एका खेळाडूसमोर ऑस्ट्रेलियाच्या 2 खेळाडूंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे टीम इंडियाचा हा खेळाडू कांगारुंचं आव्हान कसं पेलणार याकडे क्रिकेट चाहत्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
आयसीसीची घोषणा
आयसीसीने नेहमी प्रमाणे या डिसेंबर महिन्यात नोव्हेंबरमधील आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी 3 खेळाडूंना नामांकन दिलं आहे. त्यानुसार या 3 खेळाडूंमध्ये टीम इंडियाचा 1 आणि ऑस्ट्रेलियाचे 2 खेळाडू आहेत. टीम इंडियाकडून वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला नामंकन मिळालं आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेड आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे.
तिघांमध्ये झुंज, कोण जिंकणार?
🇦🇺 Travis Head 🇦🇺 Glenn Maxwell 🇮🇳 Mohammed Shami
Some fierce competition among the #CWC23 finalists for the ICC Men’s Player of the Month award for November 🔥
VOTE NOW 👉 https://t.co/D9fBeq3jkD pic.twitter.com/HyyVGN5ShL
— ICC (@ICC) December 7, 2023
आयसीसी दर महिन्यात प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कारासाठी पुरुष आणि महिला क्रिकेटमधून प्रत्येकी 3 खेळाडूंची नावं जाहीर करते. एका महिन्यात सर्वोत्तम कामगिरीच्या निकषावर खेळाडूंची नावं ठरवली जातात. त्यानुसार वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी याने सर्वाधिक 24 विकेट्स घेतल्या. तर ग्लेम मॅक्सवेल आणि ट्रेव्हिस हेड यानेही धमाकेदार फलंदाजी केली. मॅक्सवेल याने वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्या डावात सिक्स ठोकून ऐतिहासिक द्विशतक पूर्ण केलं.
मॅक्सवेलने केलेल्या या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तर हेडने वर्ल्ड कप फायनलमध्ये रोहित शर्माचा निर्णायक कॅच घेतला. तसेच विजयी धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी केली. त्यामुळे आता या तिघांमधून आयसीसी कुणाला प्लेअर ऑफ द नोव्हेंबर पुरस्काराने गौरवते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.