Icc | गोलंदाजांसाठी वाईट बातमी, आयसीसीच्या निर्णयानंतर आता त्या नियमाची अंमलबजावणी
Icc New Rule Cricket | आता क्रिकेट विश्वात नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सामन्यादरम्यान आणखी रंगत पाहायला मिळणार आहे. हा निर्णय गोलंदाजांसाठी नुकसानकारक आणि फलंदाजांसाठी फायदेशीर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आयसीसी लवकरच एका नव्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सर्व तयारी पूर्ण केली आहे. आयसीसीसीच्या या नियमाची अंमलबजावणी ही इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील टी 20 सीरिजपासून होणार आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती क्रिकेट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे गोलंदाज, कॅप्टन आणि पर्यायाने संपूर्ण टीमला आणखी सतर्क रहावं लागणार आहे. स्टॉप क्लॉक रुल या नियमाबाबत आपण बोलत आहोत.
आयसीसीच्या या स्टॉप क्लॉक रुल नियमाची ट्रायल इंग्लंड विरुद्ध विंडिज यांच्यातील टी 20 मालिकेत होणार आहे. या नियमानुसार, ओव्हर संपल्यानंतर पुढील गोलंदाजाला 60 सेकंदाच्या आत बॉल टाकावा लागेल. त्यामुळे गोलंदाजाला अलर्ट रहावं लागणार आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 2 वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं अंपायकडून लक्षात आणून दिलं जाईल. मात्र त्यानंतर तिसऱ्यांदाही जर 60 सेकंदांच्या आत पुढील ओव्हरला सुरुवात न केल्यास बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 धावा दिल्या जातील.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळाचा वेग वाढण्यासाठी आम्ही संधी शोधत आहोत. आयसीसीने यासाठी 2022 मध्ये नियम लागू केला होता. त्यानुसार ठराविक वेळेत ओव्हर पूर्ण न करणाऱ्या टीमला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 4 पेक्षा अधिक फिल्डर न ठेवण्याची परवानगी नव्हती. आता स्टॉप ट्रायल नियमाचं ट्रायल संपल्यानंतरच हा नियम चूक की बरोबर आहे, हे निश्चित होईल, असं आयसीसीचे जनरल मॅनेजर म्हणाले.
स्टॉप क्लॉकबाबत थोडक्यात
ICC implements new rule to speed up the pace of play in white-ball cricket 👀
More ⬇️https://t.co/jJEmGNrBxK
— ICC (@ICC) December 11, 2023
आयसीसी पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम आणत आहे. या नियमाची चाचपणी आधी टी 20 क्रिकेटमध्ये होईल. या नियमानुसार ओव्हर संपल्यानंतर पुढची ओव्हर 60 सेंकदात सुरु करणं बंधनकारक असणार आहे. त्यामुळे कॅप्टनला अधिक अलर्ट रहावं लागणार आहे. नियमाचं दोनदा उल्लंघन झाल्यास त्याबाबत कल्पना दिली जाईल. मात्र तिसऱ्यांदा चूक झाली की थेट प्रतिस्पर्धी संघाला अर्थात बॅटिंग करणाऱ्या टीमला 5 धावा दिल्या जातील. त्यामुळे आता आयसीसीने आणलेला हा नियम ट्रायलदरम्यान किती यशस्वी होतो आणि किती वादग्रस्त ठरतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.