Ravindra Jadeja | रविंद्र जडेजा याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी लॉटरी
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीआधी गूडन्युज मिळाली आहे.
मुंबई | टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यासाठी जीव तोडून सराव करत आहे. टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ असा हा सामना असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणारी चौथी टेस्ट मॅचही प्रतिष्ठेची झाली आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र तरी सुद्धा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याच्यासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.
आयसीसीने बेस्ट प्लेअर ऑफ मन्थ अर्थात महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. आयसीसी एका महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी 3 जणांना नामांकन देतं. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील पुरस्कारासाठी टीम इंडियाकडून रविंद्र जडेजा, इंग्लंडकडून हॅरी ब्रूक आणि विंडिजकडून स्पिनर गुडाकेश मोती या तिघांना नामांकन मिळालं आहे.
आयसीसीकडून प्लेअर ऑफ मन्थ पुरस्कारासाठी नामांकन जाहीर
??????? ?? ?
Three top performers from February have made the shortlist for the ICC Men's Player of the Month Award ?
— ICC (@ICC) March 7, 2023
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत आतापर्यंत केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आयसीसीने जडेजाची निवड केली आहे. जडेजाने फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 17 विकेट्स घेतल्या. जडेजाने दुसऱ्या कसोटीत 42 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स पटकावल्या होत्या.
तसेच जडेजाने नागपूरमधील पहिल्या कसोटीत 70 धावांची खेळी केली. त्यामुळे आता या तिघांमधून आयसीसी कुणाची निवड करतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना हा 9 मार्चपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यासह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित असणार आहेत.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया
टीम ऑस्ट्रेलिया | स्टीव्ह स्मिथ (कॅप्टन), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मॅट कुहनेमन, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क आणि मिचेल स्वीपसन.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव , सूर्यकुमार यादव आणि जयदेव उनाडकट.