Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव आणि त्याच्या क्रिकेट चाहत्यांसाठी गुडन्यूज
आयसीसीने (ICC) सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) कामगिरीची दखल घेतली आहे.
मुंबई : आयसीसीने (Icc) टीम इंडियाचा घातक बॅट्समॅन सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. आयसीसीने सूर्यकुमारच्या कामगिरीची दखल घेतली आहे. आयसीसीने सूर्यकुमारला 2022 या वर्षासाठी सर्वोत्तम पुरुष टी क्रिकेटर पुरस्कारासाठी नामांकित केलंय. तसेच महिला क्रिकेटमधून टीम इंडियाची स्मृती मंधानालाही (Smriti Mandhana) नामांकन मिळालं आहे. सूर्यकुमारने 2022 या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये तडाखेदार कामगिरी केली. (icc nominated to team india sky suryakumar yadav from icc t 20 player of the year sikandar raza sam curran)
सूर्यकुमारसह या पुरस्कारासाठी इंग्लंडच्या सॅम कुरेन, पाकिस्तानी बॅट्समॅन मोहम्मद रिझवान आणि झिंबाब्वेचा कर्णधार सिंकदर रझा यांनाही नामंकन मिळालं आहे. तर महिलांमध्ये मंधानासह पाकिस्तानी ऑलराउंडर निदा डार, न्यूझीलंडची सोफी डिवाईन आणि ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्राा या चौघांमध्ये मुख्य स्पर्धा असणार आहे.
सूर्यकुमारची धमाकेदार कामगिरी
सूर्यकुमार 2022 या वर्षात टी 20 क्रिकेटमध्ये 1 हजारन पेक्षा धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. सूर्याने टी 20 फॉर्मेटमध्ये 1 हजार 164 धावा केल्या आहेत. तसेच सूर्याच्या नावावर 2022 मध्ये सर्वाधिक सिक्सचा विक्रम आहे. तसेच याच वर्षात सूर्या आयसीसी टी 20 रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आला.
स्मृती मंधाना जादू करणार?
स्मृती गेल्या वर्षी आयसीसी टी 20 वूमन्स ऑफ द ईयर ठरली होती. स्मृती यंदाही टी 20 मध्ये शानदार कामगिरी केलीय. यामध्ये स्मृती वेगवान 23 चेंडूत वेगवान अर्धशतक करणारी पहिली भारतीय महिला ठरली. तसेच 2 हजार 500 धावा करणारी महिला ठरली. मंधानाने आपल्या कामगिरीने टीम मॅनेजमेंटला वेळोवेळी प्रभावित केलं आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात नववर्षापासून टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. प्रत्येकी 3 सामन्यांच्या या दोन्ही मालिका असणार आहेत. या दोन्ही मालिकांसाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. 3 जानेवारीपासून टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.