ICC ODI Rankings : मोहम्मद सिराज याचा वर्ल्ड क्रिकेटमध्ये धमाका, ठरला जगातील नंबर वन बॉलर
न्यूझीलंडला क्लीन स्वीप करत टीम इंडिया वनडे रँकिगमध्ये एक नंबर टीम ठरली. यानंतर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाजही वनडेतील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला आहे.
मुंबई : आयसीसीने वनडे बॉलर रॅंकिग जाहीर केली आहे. यामध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने धमाका केला आहे. मोहम्मद सिराज क्रिकेट विश्वातील एक नंबर गोलंदाज ठरला आहे. सिराजने वनडे क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. त्या कामगिरीचाच फायदा सिराज झाला आणि त्याने रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलं. सिराजने त्याच्या वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा पहिलं स्थान पटकावलंय. सिराजने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला मागे टाकत ही एक नंबर कामगिरी केली आहे.
सिराजने गेल्या 12 महिन्यांमध्ये धमाकेदार कामगिरी केली. सिराजने आपल्या बॉलिंगने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये कहर केला. सिराजने गेल्या 20 सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. विशेष बाब म्हणजे आयसीसीने जाहीर केलेल्या सर्वोत्तम वनडे टीम 2022 मध्येही सिराजचा समावेश करण्यात आला आहे.
रँकिंगमध्ये कोण कुठे?
आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सिराज व्यतिरिक्त टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाचा पहिल्या 10 मध्ये समावेश नाही. चौथ्या क्रमांकावर मिचेल स्टार्क आहे. तर राशिद खान 5 व्या क्रमांकावर विराजमान आहे.
मोहम्मद सिराज याचा आयसीसी रँकिगमध्ये धमाका
? There’s a new World No.1 in town ?
India’s pace sensation has climbed the summit of the @MRFWorldwide ICC Men’s ODI Bowler Rankings ?
More ?
— ICC (@ICC) January 25, 2023
टीम इंडियाने श्रीलंकेनंतर न्यूझीलंडचाही एकदिवसीय क्रिकेटमध्ये क्लीन स्वीप केला. टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 90 धावांनी विजय मिळवत 3-0 अशा एकतर्फी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह वनडे रँकिंगमध्ये एक नंबर होण्याचा मान मिळवला.
दरम्यान वनडे सीरिजनंतर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजला 27 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली मॅच, 27 जानेवारी, रांची
दुसरी मॅच, 29 जानेवारी, लखनऊ
तिसरी मॅच, 1 फेब्रुवारी, हैदराबाद
टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया : हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ आणि मुकेश कुमार.