Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Cricket World Cup 2027 | 4 वर्षानंतर वर्ल्ड कप कुठे होणार?

Icc World Cup 2027 | 14 वी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा 2027 मध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत एकूण किती संघ असतील, स्पर्धेच्या यजमानपदाचा मान कोणत्या देशाकडे असणार? स्पर्धा कोणत्या फॉर्मेटनुसार होणार? सर्वकाही जाणून घ्या.

ICC Cricket World Cup 2027 | 4 वर्षानंतर वर्ल्ड कप कुठे होणार?
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 5:02 PM

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 ट्रॉफी ऑस्ट्रेलियाने जिंकली. ऑस्ट्रेलिया महामुकाबल्यात 19 नोव्हेंबर रोजी टीम इंडियावर मात केली. ऑस्ट्रेलियाची वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची ही सहावी वेळ ठरली. तर टीम इंडिया 2003 नंतर पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियासमोर वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवण्यात अपयशी ठरली. टीम इंडिया सलग 10 सामने जिंकून फायनलपर्यंत अजिंक्य होती. मात्र टीम इंडियाचा पराभव झाल्याने भारतीय चाहत्यांची निराशा झाली. आता टीम इंडियाला वर्ल्ड कपसाठी आणखी 4 वर्षांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. हा वर्ल्ड कप कधी, कुठे होणार हे जाणून घेऊयात.

पुढील आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये पार पडणार आहे. या 14 व्या वनडे वर्ल्ड कपचं आयोजन हे संयुक्तरित्या 3 देशांमध्ये होणार आहे. दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबिया यांच्याकडे वर्ल्ड कप 2027 चं यजमानपद असणार आहे. याआधी 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि केन्या या देशांनी यजमानपदाची भूमिका बजावली होती.

2003 च्या वर्ल्ड कपमध्ये झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका टीमवर साखळी फेरीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. तर केन्या टीमने संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात सेमी फायनलमध्ये धडक मारली होती. टीम इंडियाने 2003 मध्ये उंपात्य फेरीत केन्या टीमवर मात करत अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र तेव्हाही याच कांगारुंनी टीम इंडियावर विजय मिळवला होता.

वर्ल्ड कप 2027 मध्ये किती टीम?

वर्ल्ड कप 2027 मध्ये एकूण 14 संघ सहभागी होणार आहेत.या 14 पैकी 3 संघ यजमान आहेत. यापैकी झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यजमान असल्याने वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे. मात्र नामिबियाला वर्ल्ड कप 2027 मध्ये खेळण्यासाठी क्वालिफायर स्पर्धा खेळावी लागेल. तर आयसीसी वनडे रँकिंगमधील 8 संघ हे थेट वर्ल्ड कप 2027 साठी पात्र ठरतील. तर 4 जागांसाठी वर्ल्ड कप क्वालिफायर स्पर्धा पार पडेल. या स्पर्धेतून 4 संघ निश्चित होतील.

वर्ल्ड कप 2027 कोणत्या फॉर्मेटनुसार?

दरम्यान वर्ल्ड कप 2027 मध्ये एकूण 14 संघ हे 2 ग्रुपमध्ये विभागण्यात येणार आहेत. त्यानुसार एका ग्रुपमध्ये 7 आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये 7 संघ असतील. त्यानंतर दोन्ही ग्रुपमधून टॉप 3 टीम पुढील फेरीसाठी पात्र ठरतील. दुसऱ्या फेरीत 6 संघांमध्ये आमनासामना होईल. एका ग्रुपमधील टीम दुसऱ्या ग्रुपमधील तिन्ही संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळेल. त्यानंतर या 6 मधून 4 संघ सेमी फायनलसाठी निश्चित होतील. तर सेमी फायनलमधून 4 पैकी 2 संघ फायनलमध्ये पोहचतील.

सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?
सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त होणार?.
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'
नाराजीच्या चर्चांनंतर भास्कर जाधव म्हणाले, 'पण ही वस्तुस्थिती...'.
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र
मुंडेंविरोधात सुरेश धस पुन्हा आक्रमक, कृषी विभागाच्या सचिवाला थेट पत्र.
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी...
बापरे... भरधाव शिवशाही बसचं पुढचं टायर निघालं, 50 हून अधिक प्रवासी....
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार
'लाडकी बहीण'बाबत सरकारचा मोठा निर्णय, 'या' लाभार्थीना योजनेतून वगळणार.
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार
'ये दादा का स्टाईल है...', माझाच भाऊ माझ्या सोबत नाही -अजित पवार.
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल
'इतना हंगामा क्यों...', धनंजय मुंडे यांच्या भेटीवरून सुरेश धसांचा सवाल.
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?
सुरेश धसांनी गेम केला की त्यांचाच गेम झाला? सापळा रचणारा व्यक्ती कोण?.
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्...
ठाकरेंच्या भास्कर जाधवांची नाराजी उघड, उदय सामंतांची थेट ऑफर अन्....
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार
'एक बार मैंने जो...', डायलॉगबाजीनं शिंदेंनी मानले कोकणवासियांचे आभार.