ICC Rankings | Age is a just Number : मानलं भावा, वयाच्या 40 व्या वर्षीही कसोटीतील नंबर वन बॉलर

| Updated on: Feb 22, 2023 | 7:59 PM

आयसीसीने आताच जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार जेम्स अँडरसनने पहिलं स्थान पटकावलं आहे. ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयात रॅंकिंगमध्ये नंबर वनच्या गोलंदाजाचा किताब मिळावणं ही मोठी गोष्ट आहे.

ICC Rankings |  Age is a just Number : मानलं भावा, वयाच्या 40 व्या वर्षीही कसोटीतील नंबर वन बॉलर
Follow us on

मुंबई : इंग्लंडचा कसोटीपटू जेम्स अँडरसनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीने आताच जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार जेम्स अँडरसनने पहिलं स्थान पटकावलं आहे. अँडरसन याआधीही रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी आला आहे, मात्र कौतुक म्हणजे त्याचं आताचं वय. ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयात रॅंकिंगमध्ये नंबर वनच्या गोलंदाजाचा किताब मिळावणं ही मोठी गोष्ट आहे. वयाची चाळीशी पूर्ण केलेल्या जेम्स अँडरसनने 866 गुणांसह कसोटीमधील नंबर एकचं स्थान मिळवलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जेम्स अँडरसनने न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील चालू असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यामध्ये चमकदार कामगिरी केली. या कामगिरीचा फायदा त्याला झाला आहे. दुसऱ्या स्थानी भारताचा स्टार खेळाडू आर. आश्विनने बढती मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये आश्विनने कसोटीतील पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 5 अशा एकूण 8 विकेट्स घेतल्या होत्या. पॅट कमिन्सला फटका बसला आहे. तो आता पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

पॅट कमिन्स 1466 दिवस पहिल्या स्थानावर विराजमान होता. 40 वर्षीय अँडरसनने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीमध्ये 7 विकेट घेतल्या. तर कमिन्सला भारताविरूद्ध फार काही विकेट्स घेता आल्या नाहीत. त्यामुळे त्याची दोन स्थानांचा फटका बसला आहे. पहिलं स्थान कायम टिकवून ठेवायचं असेल आता न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्येही अँडरसनला विकेट्स घेत  चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

जेम्स अँडरसनने वयाच्या 35 वर्षांनंतर इंग्लंडकडून 53 कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने 20.56 च्या सरासरीने 202 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने 10 वेळा 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची अप्रतिम कामगिरी केली आहे.

दरम्यान, वेगवान गोलंदाजाची अर्ध्याहून जास्त कारकीर्द ही दुखापतीमध्ये जाते. मात्र अँडरसन असा गोलंदाज आहे की जो वयाच्या 40 व्या वर्षातही फलंदाजांसाठी कर्दजकाळ ठरत आहे. इंग्लंडचा हा स्टार खेळाडू युवा वेगवान गोलंदाजांंसाठी आदर्श घेण्यासारखा आहे.

अष्टपैलूंच्या यादीत रविंद्रजडेजा हा अव्वल स्थानी आहे. तर आर अश्विन दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. तर अक्षर पटेल याला 2 स्थांनांचा फायदा झाला आहे. अशा प्रकारे टॉप 10 मध्ये टीम इंडियाच्या 3 ऑलराउंडर्सचा समावेश आहे.