ICC T 20 World Cup 2022 | मी निराश झालोय, दुखावलोय… देशातल्या क्रिकेटप्रेमींना ज्याच्यावर विश्वास तोच काय म्हणतोय पाहा!
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये भारताचा दारुण पराभव झालाय. क्रिकेट प्रेमींचं हे दुःख लाडक्या क्रिकेटपटूने नेमक्या शब्दात मांडलंय...
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये (ICC T 20 World Cup 2022) इंग्लंड (India England Match) विरोधातील सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. विशेषतः इंग्लंडविरोधातला असा पराभव भारतीय क्रिकेटप्रेमींना अत्यंत वेदनादायी ठरलाय. करोडो भारतीयांच्या मनातील याच भावना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मांडल्यात. खरं तर हा पराभव त्याच्या मनाला खोलवर जखम करणारा ठरलाय, या संदर्भाचं एक ट्विट त्याने केलंय.
हार्दिक पांड्याने या पराभवाबद्दल एक ट्विट केलंय. त्याने लिहिलंय, मी निराश झालोय. दुखावलोय. मला खूप धक्का बसलाय..
Devastated, gutted, hurt. Tough to take, for all of us. To my teammates, I’ve enjoyed the bond that we built – we fought for each other every step of the way. Thank you to our support staff for their endless dedication and hardwork for months on end. pic.twitter.com/HlVUC8BNq7
— hardik pandya (@hardikpandya7) November 10, 2022
मॅचचा असा अंत स्वीकारणं सर्वांसाठीच कठीण आहे. माझ्या टीममेटसोबत जे नातं तयार झालंय, ते खूप जवळून अनुभवलं. प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकांसाठी लढलो. अनेक महिन्यांपासून सर्वच सहकारी ज्या समर्पणाने आणि मेहनतीने झोकून देऊन काम करतायत, त्या सर्वांचा मी ऋणी आहे.
खरं तर जे झालं, हो घडायला नको होतं. पण ही लढाई सुरूच राहील, असंही हार्दिक पांड्याने म्हटलंय.
ICC टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनल राऊंडमध्ये भारताचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाला. इंग्लंडने भारताला 10 विकेट्सनं हरवलं. स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्याने या मॅचमध्ये 33 बॉलवर 63रन काढले. भारताला 168 रन्सचा स्कोअर गाठून दिला. पण इंग्लंडने 16 ओव्हरमध्येच 170 रन काढले. तेदेखील एकही विकेट न गमावता.
10 विकेटने पराभव पत्करल्यानंतर हार्दिक पांड्याच्या वेदना सोशल मीडियावरील पोस्टतून दिसून आल्या.
ऑलराउंडर असलेला हार्दिक पांड्या आता टीम इंडियाचा भावी कॅप्टन म्हणवला जातोय. त्यामुळे इंग्लंडविरोधातील पराभवाबद्दल त्याने लिहिलेल्या भावना, कोट्यवधी भारतीयांच्या मनातील भावनांप्रमाणेच खऱ्या आहेत, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.